अहमदनगर, २५ फेब्रुवारी : शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. इथेनॉलच्या टाकीला आग लागून झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. इथेनॉलच्या चार टाक्यांना ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. आग लागलेल्या ठिकाणी ७० हून अधिक कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप यात कोणतीही जिवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीय.
शेवगाव तालुका तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल डेपोला आग लागली. यात चार टाक्यांचा स्फोट झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप अनेक कामगार अडकल्याची शक्यता आहे. बचावकार्य जोरात सुरू असून अहमदनगर, औरंगाबाद, शेवगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलंय.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार मृत्यू संख्या नाही आणि मृत्यूचा आकडा देखील इतका मोठा असेल अस वाटत नाही अशी माहिती दिली आहे. कारखान्यात 150 कामगार काम करत होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे आकाशात धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar