JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'नवरा म्हणाला, मूल होत नाही जीव दे'; महिला पोहोचली थेट तलावावर अन्... औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

'नवरा म्हणाला, मूल होत नाही जीव दे'; महिला पोहोचली थेट तलावावर अन्... औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ होत नसल्याने पतीने पत्नीला जीव दे असे बोलताच पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे (औरंगाबाद), 22 फेब्रुवारी : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ होत नसल्याने पतीने पत्नीला जीव दे असे बोलताच पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. लग्न होऊन बारा वर्षे झाल्यानंतरही मूल होत नाही त्यामुळे तू कुठेतरी जाऊन जीव दे, मी दुसरे लग्न करतो असे पतीने पत्नीला म्हणत शिवीगाळ केली.

पतीच्या रोजच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय पत्नीने जीव देण्यासाठी थेट हर्सुल तलाव गाठले. मात्र सुरक्षारक्षकांच्या प्रसंग सावधान आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर दामिनी पथकाने महिलेची समजूत काढून पतीला पत्नीची माफी मागायला लावून दोघांना एकत्र आणले.

हे ही वाचा :  सावधान! तुम्हीही चुकीचा पद्धतीने स्मार्टफोन चार्ज तर करत नाही ना? बॅटरी क्षणात होईल खराब

संबंधित बातम्या

मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, विविध कार्यक्रमांची तयारी सुरु असल्याने शहरातील चौकाचौकात गर्दी होती. या दरम्यान हर्सुल तलाव येथे कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा दामिनी पथकाला फोन आला. एक महिला जीव देण्यासाठी आली असून, पटकन येण्याचे कळविले. दरम्यान दामिनी पथकाने तत्काळ हर्सुल तलाव परिसरात पोहचत आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला ताब्यात घेतले.

पीडित 27 वर्षीय महिलेचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र तिला बाळ होत नसल्याने, नवरा रोज तीला त्रास देत होता. एवढंच नाही तर, मारहाण देखील केली जात होती. तसेच तू कुठेतरी जाऊन जीव दे, म्हणजे मी दुसरे लग्न करतो, असे टोमणे पतीकडून सतत मिळत असल्याने महिला त्रासाला कंटाळली होती.  

हे ही वाचा :  लोक साखर झोपेत असताना मुंबईतल्या धारावीत झोपडपट्टीला भीषण आग, 25 घरे जळाली

जाहिरात

त्यामुळे तिने त्रस्ततेतून ती हर्सुल तलावावर जीव देण्यासाठी पोहचली. मात्र, तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांना संशय आल्याने त्यांनी महिलेला थांबवून विचारपूस केली. तेव्हा ती आत्महत्या करण्यासाठी आल्याचे समोर आले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी याची तत्काळ दामनी पथकाला माहिती दिली व अनर्थ टळला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या