मुंबई, 18 फेब्रुवारी: स्मार्टफोन ही आता गरजेची वस्तू बनली आहे. स्मार्टफोनचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. बॅटरी हा स्मार्टफोनमधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बॅटरीचं लाइफ वाढवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याविषयीच्या टिप्स आपण पाहू या. स्मार्टफोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवणं, 100 टक्के चार्ज केल्यानंतरही फोन चार्जिंग सुरू ठेवणं, चार्जिंग करताना फोन वापरणं या गोष्टी आपल्यापैकी निम्म्याहून अधिक जण करत असतात. अलीकडे अनेकांना स्मार्टफोनची इतकी काळजी असते, की बॅटरी संपली की लगेच चार्जिंगला लावली जाते. काही अभ्यासांमधून अशाच काहीशा धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या पाहून असं वाटतं की जवळपास 90 टक्के जण चुकीच्या पद्धतीने फोन चार्ज करतात आणि त्यामुळे बॅटरीच्या लाइफवर परिणाम होतो. संपूर्ण डिस्चार्ज होऊ देऊ नका : आपल्या स्मार्टफोनमधली लिथियम-आयन बॅटरी जास्त टिकावी यासाठी ती पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका. लिथियम-आयन बॅटरी शून्यापर्यंत डिस्चार्ज झाली, तर तिची क्षमता कमी होते. त्यामुळे स्मार्टफोन पूर्ण बंद होण्यापूर्वी तो मॅन्युअली बंद करण्याचा सल्ला दिला जातो. 40 ते 80 टक्क्यांदरम्यान असावी बॅटरी : स्टेबल बॅटरीसाठी चार्ज लेव्हल अपर-मिड-रेंज आहे. बॅटरी 40 ते 80 टक्क्यांदरम्यान चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बॅटरीचं लाइफ वाढेल. याचं मुख्य कारण असं, की हाय व्होल्टेजची बॅटरी खूप प्रेशरमध्ये असते आणि कमी टक्केवारी बॅटरीच्या अंतर्गत यंत्रणेवर परिणाम करू शकते. बॅटरी 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करणं टाळा : एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, इलेक्ट्रॉनची पातळी उच्च ठेवल्याने बॅटरीचं नुकसान होऊन तिचं लाइफ कमी होऊ शकतं. प्रत्येक चार्जिंगवेळी तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी किती चार्ज करावी, याची रेंज डिव्हाइस आणि डाटानुसार बदलते. परंतु, ती असणं केव्हाही फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुमचा फोन कधीही 80 टक्के क्षमतेपेक्षा जास्त चार्ज करू नका. बॅटरी थंड ठेवा : उष्णता आणि हाय व्होल्टेज या दोन्ही गोष्टी फोनच्या बॅटरीच्या लाइफचे शत्रू आहेत. त्यामुळे फोन शक्य तितका थंड ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. वारंवार चार्ज करणं : थोडंसं चार्जिंग कमी झालं तर वारंवार बॅटरी चार्जिंग करण्याची काही जणांना सवय असते. यामुळे बॅटरीचं लाइफ कमी होतं. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चार्जिंग कमी झालं, तरच बॅटरी चार्ज करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.