JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला आणि आयुष्यात चहानं आणला गोडवा! पाहा Video

Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला आणि आयुष्यात चहानं आणला गोडवा! पाहा Video

Success Story : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात काही वर्ष घालवल्यानंतरही नव्या जागा निघत नव्हत्या. त्यावेळी औरंगाबादच्या तरुणानं चहावाला होण्याचं ठरवलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी  औरंगाबाद, 8 फेब्रुवारी : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अनेक तरुण करतात. ही परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न असतं. पण, सतत वाढणारी स्पर्धा, कमी जागा आणि परीक्षेचं अनियमित प्रमाण यामुळे सर्वच तरुणांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. काही तरुण यामुळे निराश होतात. तर काही जण वेळीच बाहेर पडत नवी वाट निवडतात. औरंगाबादच्या एक तरुणानंही वेळीच यामधून बाहेर पडत चहावाला होण्याचं ठरवलं. आता त्याचा महिन्याचा 1 लाख 25 हजारांहून अधिक टर्नओव्हर आहे. का बदलली वाट? शुभम तळणीकर आणि संकेत पालवे या दोन तरुणानं औरंगाबादमध्ये ‘चाय मेकर्स’ या व्यवसायाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण केलीय. हे दोघंही बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा या गावचे. त्यांनी औरंगाबादमध्ये बीएससीचं शिक्षण घेतलं. या शिक्षणानंतर संकेतनं पुण्यात जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोन-तीन वर्ष या अभ्यासात घालवल्यानंतरही जागा निघत नव्हत्या. तर, शुभम हा पंजाबमधील एका कंपनीमध्ये मार्केटींगचा जॉब करत असे. या जॉबमध्ये शुभम समाधानी नव्हता. दोन्ही मित्र आयुष्यात यशस्वी होण्यासाठी धडपडत होते. त्याचवेळी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लॉकडाऊन लागलं. स्पर्धा परीक्षेच्या जागा निघत नव्हत्या. त्यावेळी संकेतनं व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानं शुभमलाही सोबत व्यवसाय करण्याची ऑफर दिली. Video : नोकरी गेली तरी मानली नाही हार, मुंबईच्या तरुणानं अमरावतीत उभारला व्यवसाय 7 महिन्यात लाखांचा टर्नओव्हर संकेत आणि शुभम यांनी औरंगाबादमध्ये चहा कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कॅफेसाठी तब्बल तीन लाख खर्च करुन नागेश्वरवाडी भागात सेटअप उभारला. दोघंही व्यवसायात नवीन होते. त्यांना कोणताही अनुभव नव्हता. पहिल्या तीन महिन्यांमध्ये काही प्रतिसाद नसल्यानं ‘आपण चूक केली नाही ना’ असा विचार त्यांच्या मनात आला होता. दर्जेदार चहाची क्वालिटी, संयम आणि सातत्य या जोरावर त्यांचा व्यवसाय वाढू लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कॅफेची प्रसिद्धी झाली. चाय मेकर्स कॅफे सुरू होऊन आता सात महिने झाले आहेत. या कमी कालावधीमध्येच त्यांचा महिन्याचा टर्नओव्हर एक लाख 25 हजार झाला आहे.

‘स्पर्धा परीक्षेचा जोरदार अभ्यास केला पण जागा निघत नसल्यानं भविष्याबाबत चिंता होती. त्यामुळे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आता या व्यवसायात जम बसला आहे. आगामी काळातही हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे ‘, असं कॅफेचे मालक संकेत पालवे यानं सांगितलं. मित्राचा ऐकला सल्ला आणि कोल्हापूरकरांना मिळाला ‘लय भारी’ पदार्थ, Video उच्च शिक्षणानंतर इतर ठिकाणी नोकरी करुन समाधानकारक उत्पन्न मिळत नाही हा आम्हाला अनुभव आला होता. त्यामुळे व्यवसाय सुरू करणे आवश्यक होते. आमच्या कॅफेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे लवकरच नवी शाखा सुरू करणार आहोत, असं या कॅफेचे आणखी दुसरे मालक शुभम तळणीकर यांनी सांगितलं.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या