जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : नोकरी गेली तरी मानली नाही हार, मुंबईच्या तरुणानं अमरावतीत उभारला व्यवसाय

Video : नोकरी गेली तरी मानली नाही हार, मुंबईच्या तरुणानं अमरावतीत उभारला व्यवसाय

bapu khartale started a hotel business

bapu khartale started a hotel business

कोरोना काळात नोकरी गेली. मात्र यातून सावरत तरुणाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.

  • -MIN READ Amravati,Amravati,Maharashtra
  • Last Updated :

    अक्षय पुंडेकर, प्रतिनिधी अमरावती, 03 फेब्रुवारी : कोरोना काळात अनेकांच्या जीवनात चढउतार आले आहेत. अनेक तरुणांच्या नोकऱ्या देखील गेल्या. अमरावती मधील देखील एका तरुणाची कोरोना काळात नोकरी गेली. मात्र यातून सावरत या तरुणाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. बापू खरतळे असं तरुणाचं नाव असून त्याने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.   मुंबईच्या एका नामवंत कंपनीतून अमरावतीमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर लॉकडाऊन काळात बापूचा जॉब गेला. नोकरी गेल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी बापूने एका टेबलवर छोटसं चाट सेंटर सुरू केलं. अमरावती शहरात आराध्या साऊथ इंडियन चाट सेंटर म्हणून ओळख असलेल्या हाॅटलमधून बापू आज चांगली कमाई करत आहे. नोकरी गेल्यानं नैराश्य  मुंबईतील मलाडमध्ये राहणाऱ्या बापू खरतळे हा मुंबईच्या एका नामवंत कंपनीमध्ये जॉब करत होता. त्याची ट्रान्सफर अमरावती येथे कॅटबरीमध्ये झाली. पण कोरोना काळात त्याचा जॉब गेला, मग अत्यंत नैराश्य आलं. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत साधारण असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी हॉटेल सुरू केलं.  

    News18लोकमत
    News18लोकमत

    10 रुपये प्लेट  अमरावती शहरातील पंचवटी चौक हा शाळा, महाविद्यालये तसेच अनेक शैक्षणिक संस्था असलेला वर्दळीचा परिसर आहे. इथल्या चौपाटीवर अनेक खमंग, आणि चटपटीत पदार्थाचे अनेक चाट सेंटर आहे. प्रामुख्याने याठिकाणी इंदोरी पोहा हा खूप चालतो. पण इथे ढोकळा हा पदार्थ कुठेही मिळत नसल्याने, बापू खरतळे याने अत्यंत कमी पैशात म्हणजेच फक्त 10 रुपये प्लेट प्रमाणे ढोकळा विकायला सुरुवात केली.   शेतकऱ्यांनी शोधली बिझनेस आयडिया, ग्रामीण भागात होतीय लाखोंची उलाढाल जेव्हा प्रथम चाट सेंटरची सुरुवात केली होती. तेव्हा फक्त एका छोट्या टेबलवर हा व्यवसाय सुरू केला होता. परंतु आता चारचाकी वाहनावर तयार केलेले मोठे हॉटेल पंचवटी चौकात उभे आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात