JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; लघवीसाठी वाहन थांबवलं अन् क्षणात कुटुंब संपलं

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; लघवीसाठी वाहन थांबवलं अन् क्षणात कुटुंब संपलं

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे.

जाहिरात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 4 जून, राहुल खंडारे : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील फर्दापुर जवळ हा अपघात झाला आहे. हे कुटुंब वाशिममध्ये आयोजित लग्नसोहळा आटोपून मालेगावकडून  परत येत होतं. मात्र वाटेतच मृत्यूनं गाठलं. विचित्र अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  परतीच्या प्रवासात घात  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डिग्रस येथील मांटे कुटुंब टाटा निस्सान या आपल्या वाहनानं वाशिममध्ये आयोजित लग्नसोहळा आटोपून परतीच्या प्रवासाला निघालं होतं. दरम्यान फर्दापूर नजीकच्या चॅनेल क्रमांक 283 जवळ वाहन थांबवून त्यातील तिघे लघवी करण्यासाठी खाली उतरले, त्याचवेळी त्यांच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकनं त्यांना उडवलं. त्यानंतर ही ट्रक पुढे त्यांच्या वाहनावर जाऊन आदळली. तिघांचा मृत्यू  या अपघातात वाहानाच्या खाली उतरलेले विजय शेषराव मांटे, तुषार गजानन मांटे व ओम विजय मांटे, हे तिघेजण ठार झाले आहेत. तर गाडीत असलेले अन्य तिघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या