बुलढाण्यात भीषण अपघात
बुलढाणा, 29 जुलै, राहुल खंडारे: जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर हा अपघात झाला आहे. दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. समोरासमोर धडक घटनेबाबत अधिक माहिती अशी की दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहावर पहाटे तीन वाजता हा भीषण अपघात झाला. ही घटना लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली आहे.यातील एक ट्रॅव्हल्स ही तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेनं येत होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 भाविक होते. तर समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात होती.
एसटी बसचा आणखी एक धक्कादायक Video समोर, चालकाच्या एका हातात स्टेरिंग तर दुसऱ्या हातात…जखमींवर रुग्णालयात उपचार या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 प्रवासी जखमी आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाण्यात हलवण्यात आलं आहे. दरम्यान यातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.