JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bus accident : मोठी बातमी! बुलढाण्यात एसटीचा भीषण अपघात; 55 प्रवाशांची बस घाटात पलटी

Bus accident : मोठी बातमी! बुलढाण्यात एसटीचा भीषण अपघात; 55 प्रवाशांची बस घाटात पलटी

जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे.

जाहिरात

बुलढाण्यात बसचा भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलढाणा, 25 जुलै, राहुल खंडारे : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं ही बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमधून एकूण 55 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांकडून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Andheri Landslide : मोठी बातमी! अंधेरीमध्ये लँडस्लाईड; लोक झोपेत असतानाच कोसळली दरड

संबंधित बातम्या

बसचं ब्रेक फेल झाल्यानं अपघात मलकापूर -बुलढाणा या बसमधून 55 प्रवासी प्रवास करत होते, बस राजूर घाटात आल्यानंतर बसचं ब्रेक फेल झालं. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. बस घाटात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या