JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Amravati Sister Sexually Assaulted : तिच्या रक्षणाचे बांधले बंधन, तिच्याच शरिराचे तोडले लचके, भाऊ-बहिण नात्याची भयानक घटना

Amravati Sister Sexually Assaulted : तिच्या रक्षणाचे बांधले बंधन, तिच्याच शरिराचे तोडले लचके, भाऊ-बहिण नात्याची भयानक घटना

अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चुलत भावाने बहिणीला धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 11 फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चुलत भावाने बहिणीला धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नराधम चुलत भाऊ हा मागच्या चार महिन्यापासून तिच्यावर लैंगिक शोषण करत होता. ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 19 वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी पीडित 15 वर्षीय मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. यावेळी चुलत भावाने तू माझी बहीण आहेस, मला माहित आहे. परंतु तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे तिला सांगितले. मात्र, या सगळ्याला त्या अल्पवयीन मुलीचा विरोध होता. परंतु, भावाने तिच्यावर जबरदस्ती करत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरू झाली.

हे ही वाचा :  बोलण्यात गुंतवून तरुणासोबत भयानक कांड; बीड हादरले, फरार आरोपींचा शोध सुरू

संबंधित बातम्या

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला तू मला खूप आवडतेस, म्हणत शरीरसुखाची मागणी केली. बहीण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात येताच तो तिला धमकी देत राहिला. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तेथून सलग 8 दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत माहिती पडल्यास कुटुंबातील सदस्य मारतील, या भीतीने तिने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.

जाहिरात

दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी शाळेतून परत येत असताना पीडितेला स्वतःमध्ये काही शारीरिक बदल जाणवल्याने तिने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर ती मैत्रिणीच्या सल्ल्याने तपासणीसाठी एका रुग्णालयात गेली. यावेळी डॉक्टरांनी तिला तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने याबाबत आपल्या आई व आजीला माहिती दिली. त्यानंतर आईसह पुन्हा रुग्णालयात जावून तिने तपासणी केली.  

जाहिरात

हे ही वाचा :  धक्कादायक! पती चक्क मित्र आणि प्राण्यांशी संबंध ठेवायचा, पत्नीन व्हॉट्सअ‍ॅप चॅट पाहिल अन्. ..

त्यावेळीही ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सूचविण्यात आले. त्यानुसार पीडितेने आईसह कोतवाली ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या