रांची, 10 फेब्रवारी : झारखंडमधील रांचीमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण रांचीच्या सदर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. एका महिलेकडून तिच्या पतीविरुद्ध धक्कादायक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने पतीवर केवळ समलैंगिक असल्याचा आरोप केला नाही, तर तिचा पती प्राण्यांसोबतही शारीरिक संबंध ठेवत होता, असे तिने दाखल केलेल्या गुन्ह्यात लिहिले आहे. यासोबतच महिलेकडून पतीवर हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आरोप केला आहे. यावर पोलीस अधिक तपास करत आहेत.
रांचीच्या सदर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या महिलेने अर्जात लिहिले आहे की, तिच्या पतीने तिला एका वेगळ्याच भ्रमात ठेवून तिच्याशी लग्न केले. महिलेच्या म्हणण्यानुसार, 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात तिचे लग्न झाले होते, परंतु लग्नाच्या एक महिन्यानंतर पतीकडून हुंड्याची मागणी करण्यात आली, सोबतच छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ लागले. यादरम्यान तो तिच्याशी भांडू लागला पण तरीही ती पतीला सोडण्यास तयार नव्हती.
हे ही वाचा : बोलण्यात गुंतवून तरुणासोबत भयानक कांड; बीड हादरले, फरार आरोपींचा शोध सुरू
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी त्या महिलेने असे काही व्हिडिओ आणि फोटो पाहिले. यावरून तिची झोपच उडाली. यादरम्यान तिला एक व्हॉट्सअॅप चॅट पाहायला मिळाले, ज्यावरून तिला तिच्या पतीच्या समलैंगिक संबंधांची माहिती मिळाली. मित्रांसोबतच नाही तर त्या महिलेला तिच्या पतीचे प्राण्यांशीही संबंध असल्याचे समोर आले.
याबाबत महिलेने तिच्या पतीला विचारले असता, पतीने तिला मारहाण केली. याचबरोबर तुला काय करायचे ते कर माझे कोणीही नुकसान करू शकत नाही, असा थेट इशारा दिला. यानंतर ती महिला न्यायासाठी पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : एका पोलिसाची केली हत्या अन् दुसऱ्या अधिकाऱ्याला संपवायला चिपळूणला निघाला, पण…
रांचीच्या सदर पोलीस ठाण्यात महिलेने पतीविरुद्ध हुंडाबळीसाठी छळ, मारहाण, फसवणूक यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.