मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बोलण्यात गुंतवून तरुणासोबत भयानक कांड; बीड हादरले, फरार आरोपींचा शोध सुरू

बोलण्यात गुंतवून तरुणासोबत भयानक कांड; बीड हादरले, फरार आरोपींचा शोध सुरू

हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने नयूम याला घराबाहेर बोलावून घेतले होते. त्यानंतर घडलेल्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने नयूम याला घराबाहेर बोलावून घेतले होते. त्यानंतर घडलेल्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने नयूम याला घराबाहेर बोलावून घेतले होते. त्यानंतर घडलेल्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 10 फेब्रुवारी, सुरेश जाधव :  जिल्ह्यातील अंबाजोगाईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची भररस्त्यात धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. नयूम अली चाऊस उर्फ बिल्डर (वय 37) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भररस्त्यात हत्या झाल्यानं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोर घटनास्थळावरून पसार  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हल्लेखोरांनी बोलण्याच्या बहाण्याने नयूम याला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेऊन हल्लेखोरांनी फायटर, तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने नयूमवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नयूमचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : एका पोलिसाची केली हत्या अन् दुसऱ्या अधिकाऱ्याला संपवायला चिपळूणला निघाला, पण...

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण  

भररस्त्यात  नयूम अली चाऊस या तरुणाची हत्या करण्यात आल्यानं शहरता खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news, Crime news