JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतात महाबीजचं बियाणं पेरलं पण हिरवं सोनं उगवलंच नाही; अमरावतीतील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना गाठलं अन्...

शेतात महाबीजचं बियाणं पेरलं पण हिरवं सोनं उगवलंच नाही; अमरावतीतील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना गाठलं अन्...

जिल्ह्यातील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर महाबीजचे बियाणे पेरले. मात्र, पीक उगवलंच नाही.

जाहिरात

महाबीजचं बियाणं उगवलंच नाही

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संजय शेंडे, अमरावती 22 जुलै : जिल्ह्यातील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर महाबीजचे बियाणे पेरले. मात्र, पीक उगवलंच नाही. जवळपास 35 शेतकऱ्यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात कृषी विभागाच्यावतीने शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्यात आली. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हे भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथे राज्य पुरस्कृत अंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे पुरवठा करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी शेतामध्ये या बियाण्यांची पेरणी केली. मात्र, ते उगवलेच नाहीत. यानंतर पूर्णानगर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर महाबीज कंपनीचे कृषी विभागाचे आधिकारी पंचनामे करण्याकरता पोलीस बंदोबस्तात आले. महाबीजचे बियाणे निकृष्ट दर्जाचे आणि बोगस असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना पूर्णानगरच्या ग्रामपंचायतमध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार 14 जुलै रोजी उघडकीस आला होता. Tomato price : बाजारात नेण्यासाठी रात्री 25 क्रेट गाडीत भरले; सकाळी गाडी पाहून हादरला शेतकरी यावर्षी सुरवातीला रब्बीच्या हंगामात याच भागात गारपिटीने पीक उद्धवस्त झालं होतं, तर आता खरीप हंगामात महाबीजचे बियाणे पेरणी करूनही उगवलं नाही. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे 35 लेखी तक्रारी केल्या आहेत. बियाणे न निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. तर कृषी विभाग शेतात पंचनामे करण्यासाठी पोलिसांना सोबत घेऊन आल्याने शेतकरीराजा संतप्त झाला असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख यांनी याची गंभीर दखल घेतली असून त्यांनी थेट शेतात जाऊन पाहणी केली. यानंतर एक समिती गठीत केली असून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस संरक्षण मागितलं असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. आता तातडीने शेतकऱ्यांना बियाणे देऊ शकत नाही. पंचनामे केल्यानंतर बियाण्यांमध्ये काही दोष आढळतो का हे पाहून त्यानंतर निर्णय घेऊ, असं कृषी अधिकारी प्रमोद खर्चान यांनी सांगितलं. आता खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला. मात्र महाबीजचं बियाणं उगवलं नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार आणि कधी शेतकरी दुबार पेरणी करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाचा अंतिम अहवाल कधी येणार आणि नवीन बियाणे व भरपाई खरंच मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण सुरुवातीला कर्ज आणि उसणे पैसे घेत या सगळ्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यामुळे उशिरा झालेली दुबार पेरणी यशस्वी होईल का? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? हा सवाल उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या