JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 12th Exam English Paper : इंग्रजीचा पेपर नको रे बाबा, तब्बल 4 हजार पोरं परिक्षा केंद्रावर फिरकलेच नाही!

12th Exam English Paper : इंग्रजीचा पेपर नको रे बाबा, तब्बल 4 हजार पोरं परिक्षा केंद्रावर फिरकलेच नाही!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 23 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला अमरावती विभागातून तब्बल 3964 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. त्यात अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या पाचही जिल्ह्यामध्ये विभागातील 523 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरू असून इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी विभागातून एक लाख 41 हजार 374 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख 37 हजार 410 विद्यार्थ्यांनी पेपर दिला, तर 3964 विद्यार्थी गैरहजर होते. त्यामुळे इंग्रजी विषयाचा धसका घेत पाचही जिल्ह्यातील 3964 विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाच्या पेपरकडे पाठ फिरवली आहे. विभागात 97.19% विद्यार्थानी पेपरला हजेरी लावली.

हे ही वाचा :  लातूरची सून टीना डाबीचा 5 सेकंदाचा VIDEO तुफान Viral, 20 लाख लोकांपर्यंत पोहोचला, काय आहे खास?

संबंधित बातम्या

12 वीच्या पहिल्याच पेपरमध्ये झाली मोठी चूक

आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

फेब्रुवारी २०२३ यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले.  

हे ही वाचा :  MH Board Exam: इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी चक्क छापून आलं उत्तर; एक्सट्रा मार्क्स मिळणार का? बोर्डानं दिलं स्पष्टीकरण

जाहिरात

काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या