जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / लातूरची सून टीना डाबीचा 5 सेकंदाचा VIDEO तुफान Viral, 20 लाख लोकांपर्यंत पोहोचला, काय आहे खास?

लातूरची सून टीना डाबीचा 5 सेकंदाचा VIDEO तुफान Viral, 20 लाख लोकांपर्यंत पोहोचला, काय आहे खास?

आयएएस अधिकारी टीना दाबी

आयएएस अधिकारी टीना दाबी

लातूरच्या सुनेची पुन्हा चर्चा होत आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

लातूर, 21 फेब्रुवारी : लातूरच्या सून असलेल्या टीना दाबी या देशातील सर्वात लोकप्रिय महिला आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. लाखो लोक त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. टीना दाबी या राजस्थान केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या पुन्हा आता चर्चेत आल्या आहेत. का होतेय लातूरच्या सूनेची चर्चा -  टीना दाबी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या खूप आनंदी असून वेगवेगळे लूक देताना दिसत आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आतापर्यंत इंस्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. त्याच वेळी, सुमारे 2.3 लाख लोकांनी त्याला लाइक केले आहे.

जाहिरात

टीना दाबी यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1993 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. भोपाळ येथूनच त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्या सातव्या वर्गात शिकत असताना त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले. टीना दाबी या सध्या राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत. जिल्ह्याचे डीएम म्हणून त्यांची ही पहिली पोस्टिंग आहे. यापूर्वी त्यांनी शासनाच्या विविध विभागात काम केले आहे. टीना दाबी यांचे दुसरे लग्न झाल्यावर त्यांना जैसलमेर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनवण्यात आले. त्यांनी यूपीएएसीच्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. हेही वाचा -  Success Story : ब्रेक घेऊन UPSC ची तयारी, 22 व्या वर्षीच तरुणीची कमाल, झाली IFS अधिकारी गेल्या वर्षी टीना दाबी यांनी राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आणि मूळ लातूरचे असलेले प्रदीप गावंडेसोबत दुसरे लग्न केले. टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांची भेट कोरोनादरम्यान झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यानंतर लग्न केले. याआधी टीना दाबी यांनी 2 वर्षे डेटिंग केल्यानंतर 20 मार्च 2018 रोजी त्यांचे बॅचमेट आयएएस अथर आमिर खानसोबत कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, त्यांचे लग्न यशस्वी न झाल्यामुळे दोघेही 2021 मध्ये स्वतःच्या इच्छेने वेगळे झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात