अमरावती, 01 एप्रिल : अमरावती (Amravati) येथील एका 27 वर्षीय तरुणाचा लंडनच्या (london) नॉर्थ स्लोग बर्कशायर या शहरात मृत्यू झाला होता. मात्र या युवकाचे पार्थिव अमरावती येथे त्याच्या कुटुंबाला तब्बल 18 दिवसानंतर मिळाले. अमरावतीच्या बडनेरा पवननगर येथील विपुल कोल्हे हा युवक आपल्या गुणवत्तेच्या बळावर नोकरीसाठी लंडन येथे गेला गेला होता. मात्र 12 मार्च रोजी विपुलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. विपुलच्या मित्राकडून ही दुःखद बातमी विपूलच्या आई-वडिलांना मिळाली. मुलाच्या मृत्यूने कोल्हे कुटुंबीय पूर्णता खचून गेले व त्यांनी आपल्या मुलाचे पार्थिव शरीर अमरावतीला घरी आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली. भारतातून कापूस, साखर आयात करणार नाही; पाकिस्तानने का घेतला निर्णय मागे? भारत सरकार आणि लंडनच्या परराष्ट्र मंत्रालयात ही यासंदर्भात संवाद झाला आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर तिथेच शवविच्छेदन करण्यात आले यासाठी युके प्रशासनाला भारतीय दूतावासाची परवानगी घ्यावी लागली व यासाठी तब्बल अठरा दिवसाचा कालावधी लागला. त्यानंतर विपुलचे पार्थिव शरीर धुलीवंदनाच्या दिवशी विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले व मुंबई येथून रुग्णवाहिकेनं बडनेरा येथे आणण्यात आले. त्यानंतर हिंदू स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. IPL ला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंची हकालपट्टी करा, इंग्लंडचा क्रिकेटपटू भडकला बडनेरा येथील राजेश्वर युनियन हायस्कूलच्या प्राचार्य राजश्री कोल्हे व सेवानिवृत्त शिक्षक अनिल कोल्हे यांचा विपुल हा मुलगा. विपुलने बडनेरा येथील राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर पुण्याच्या एका कंपनीत नोकरीसाठी गेला होता. विपुलची गुणवत्ता व काम करण्याची चिकाटी आणि धडाडी पाहून पुण्याच्या कंपनीने विपुलला लंडन येथे पाठवले. विपुलच्या नियुक्तीनंतर त्याच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात प्रचंड आनंद झाला होता मात्र हा आनंद केवळ काही काळ टिकला. विपुल हा नॉर्थ स्लॉग शहरात राहत होता व 12 मार्च रोजी त्याला घरीच हृदय विकाराचा तीव्र झटका आला व त्याचा मृत्यू झाला.वी पुढच्या मृत्युने आई-वडिलांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे विपुल अत्यंत सुस्वभावी हुशार व नम्र अशी ख्याती होती.