जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / भारतातून कापूस, साखर आयात करणार नाही; पाकिस्तानने का घेतला निर्णय मागे?

भारतातून कापूस, साखर आयात करणार नाही; पाकिस्तानने का घेतला निर्णय मागे?

भारतातून कापूस, साखर आयात करणार नाही; पाकिस्तानने का घेतला निर्णय मागे?

पाकिस्ताननं (Pakistan) भारतासोबत (India) पुन्हा एकदा व्यापार संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्या दिवशी इम्रान सरकारने भारतातून कापूस (Cotton) आणि साखर (Sugar) आयातीचा निर्णय मागे घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 01 एप्रिल: ‘धरलंय तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी काहीसी गत पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्ताननं (Pakistan) भारतासोबत (India) पुन्हा एकदा व्यापार संबंध (Paksitan - India trade) प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. इम्रान सरकारने भारतातून कापूस (Cotton) आणि साखर (Sugar) आयातीचा निर्णय घेतला आहे. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय रद्द केला आहे. गेल्या 19 महिन्यांपासून दोन्ही देशातील व्यवहार ठप्प होते. मात्र याचा थेट फटका पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्ताननं 2016 पासून भारतातून कापूस आणि अन्य कृषी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली होती. पाकिस्तानात कापसाचा तुटवडा असल्याने त्याचा थेट परिणाम कापड उद्योगावर झाला आहे. त्यामुळे कापसाचा तुटवडा आणि साखरेच्या वाढत्या किंमती पाहता पाकिस्तानने भारतासोबत पुन्हा व्यवहार करण्यास मंजुरी दिली होती. भारतातून कापूस आयात करावा अशी मागणी होती. पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना जून 2021 पर्यंत भारतातून कापूस आयात करणार होता. त्याचबरोबर साखरेच्या आयातीवरही लवकरच निर्णय घेतला जाणार होता. मात्र पाकिस्तानी नागरिकांचा विरोध पाहता कॅबिनेट आर्थिक समन्वय समितीचा निर्णय पाकिस्तान सरकारने रद्द केला आहे. काश्मीरप्रश्नी पाकिस्तान भारतासमोर झुकल्याची ओरड होऊ लागल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. हे वाचा -   अर्जेरिया शरदचंद्रजी : शरद पवारांचं नाव सह्याद्रीतल्या एका वनस्पतीला प्रदान दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या महिन्यात होण्याऱ्या क्लायमेट चेंज वर्च्युअल समिटसाठी पाकिस्तानला निमंत्रण दिलेले नाही. साउथ आशियातील भारतासह बांगलादेश आणि भूटानसह आणि इतर देशांना आमंत्रित केले आहे. मात्र पाकिस्तानला डावलल्याने अमेरिकेसाठी पाकिस्तानचं महत्त्व कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेनं निमंत्रण न दिल्याने पाकिस्तानी मीडियाने नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात