IPL ला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंची हकालपट्टी करा, इंग्लंडचा क्रिकेटपटू भडकला

IPL ला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंची हकालपट्टी करा, इंग्लंडचा क्रिकेटपटू भडकला

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी (IPL 2021) न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून (England vs New Zealand) माघार घ्यायला तयार आहेत, पण यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) चांगलाच भडकला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी (IPL 2021) न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून (England vs New Zealand) माघार घ्यायला तयार आहेत, पण यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) चांगलाच भडकला आहे. राष्ट्रीय क्रिकेटपेक्षा जे खेळाडू फ्रॅन्चायजी क्रिकेटला महत्त्व देतात, त्यांना गुडबाय करायची वेळ आली आहे, असं वॉन म्हणाला आहे. मायकल वॉनने द टेलीग्राफ या वृत्तपत्रामध्ये याबाबतचा स्तंभ लिहिला आहे.

'यामुळे चुकीचा संदेश जात आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अशा खेळाडूंवर कारवाई करावी. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आयपीएलवरून खेळाडूंशी वाद घालू इच्छित नाही, असं ऍशले जाईल्स म्हणाला. यावरून वाद झाला तर आपण मोठे खेळाडू गमावू, अशी भीती त्याने व्यक्त केली. पण यामुळे चुकीचा संदेश जात आहे. जर एखादा 26-27 वर्षांचा खेळाडू माझ्याकडे आला आणि म्हणाला, मला इंग्लंडसोबतचा करार सोडून आयपीएल आणि फ्रॅन्चायजी क्रिकेट निवडायचं आहे, तर मी त्याला जा असंच सांगितलं असतं,' असं वॉन म्हणाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7,728 रन करणाऱ्या मायकल वॉनने या वादावर तोडगा काढण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सल्लाही दिला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यासारख्या खेळाडूंचा करार वाढवला पाहिजे. जर इंग्लंड क्रिकेटची इच्छा असेल तर ते चांगल्या खेळाडूंना 2-3 वर्षांचा करार देऊ शकतात. चांगल्या खेळासाठी तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम खेळाडूची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यामुळे बेन स्टोक्स (Ben Stokes)-जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांच्यासारख्या खेळाडूंसोबत एका वर्षापेक्षा जास्तचा करार का केला जाऊ शकत नाही? असा सवाल वॉनने विचारला.

आयपीएल खेळल्यामुळे इंग्लंडच्या टीमचाच फायदा होईल, कारण यावर्षी भारतामध्येच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, असं बेन स्टोक्स म्हणाला होता. यावर्षी इंग्लंडचे 15 खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. यामध्ये ऑयन मॉर्गन, जॉस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्स, लियाम लिविंगस्टोन, जेसन रॉय आणि डेविड मलान यांचा समावेश आहे.

Published by: Shreyas
First published: April 1, 2021, 8:18 PM IST

ताज्या बातम्या