JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / छत्रपती शिवाजी महाराजांपासून वीर सावरकरांपर्यंत; अमित शहांनी सांगितल्या महाराष्ट्राच्या 3 परंपरा

छत्रपती शिवाजी महाराजांपासून वीर सावरकरांपर्यंत; अमित शहांनी सांगितल्या महाराष्ट्राच्या 3 परंपरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील मंत्री उपस्थित होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 एप्रिल : ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आज दिल्लीहून फक्त अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव करण्यासाठी मी इथे आलोय. ज्यांनी मला अप्पासाहेब यांचा गौरव करण्याचा सन्मान मला दिला अशा महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. नानासाहेब, अप्पासाहेब आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे सचिनभाऊ धर्माधिकारी आणि इथे बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकाच्या सन्मान सोहळ्यासाठी आलेला हा इतका मोठा जनसागर मी पहिल्यांदाच पाहतोय. इतक्या कडक उन्हात बसलेले तुम्ही सर्वजण हेच सांगतात की तुमच्या मनात अप्पासाहेब यांच्यासाठी किती प्रेम, सन्मान आणि श्रद्धा आहे. असा मान, सन्मान, श्रद्धा ही फक्त त्याग, समर्पण आणि सेवेतूनच मिळते. अप्पासाहेबांमध्ये हे सर्व दिसतं. तुमचं प्रेम, विश्वास हेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. गर्दीचं अनुकरण करू नका, तुम्ही असं काही करा की गर्दी तुमच्या पावलावर चालेल. आज लाखो लोक इथं आलेत असं अमित शहा म्हणाले. कोण आहेत ‘महाराष्ट्र भूषण’ने गौरवण्यात येणारे अप्पासाहेब धर्माधिकारी? मी १२ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. इतिहासाचा विद्यार्थी आहे. देशविदेशाचा इतिहास वाचला. लक्ष्मीचा आशीर्वाद कित्येक पिढ्यांपर्यत असतो. मी हेसुद्धा पाहिलं आहे की एकाच कुटुंबात अनेक पिढ्या वीर जन्माला येतात. सरस्वतीची कृपाही अनेक पिढ्यांपर्यंत असते. पण समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत असल्याचं पहिल्यांदाच पाहिलं असल्याचंही अमित शाहांनी सांगितलं. महाराष्ट्राने देशाला तीन परंपरा दिल्या असल्याचं सांगताना अमित शहा यांनी म्हटलं की, मी महाराष्ट्रात, रायगडमध्ये आहे. महान छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. राष्ट्रासाठी आहुती देण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरु झाली. वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू आणि लोकमान्य टिळक यांच्यासारख्या लोकांनी महाराष्ट्राच्या भूमीतून आपलं आयुष्य देशासाठी वाहिलं. दुसरी परंपरा भक्तीची, समर्थ रामदासांपासून ते तुकाराम महाराज ते नामदेव महाराजांपर्यंत भक्तीच्या क्षेत्रात नेहमीच देशाला वाट दाखवण्याचं काम केलंय. तिसरी परंपरा ती म्हणजे सामजिक परिवर्तनाची परंपरा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सामाजिक आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. अप्पासाहेबांनी सामाजिक सेवा पुढे नेण्याचं काम, भगीरथ ओढण्याचं काम केलंय. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी ते अनुयायांची गर्दी, पाहा खास Photos अमित शहा म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना याआधी पद्मपुरस्कार देण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यम्ंत्री असताना त्यांनी मोदींना सांगितलं होतं की त्यांना पद्मपुरस्काराने सन्मानित करा. आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना दिला जातोय. या पुरस्काराची सुरुवात भाजप-शिवसेना सरकारने याची सुरुवात केली. महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेत योगदान देणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत पुल देशपांडे, लता मंगेशकर, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, अनिल कोकाडकर, शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, सुलोचना दिदी यांना हा पुरस्कार दिला गेला. आता या यादीत नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार मिळतोय. पहिल्यांदा एकाच घरात दोघांना हा पुरस्कार दिला जातोय. तुमचे हे काम असंच पुढे वाढत चालत राहो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. मी पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. योग्य व्यक्तीला त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्र भूषणचा सन्मान वाढवला. त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो असं अमित शहा म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या