ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळणार असल्यानं त्यांच्या अनुयायांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली आहे. मात्र सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.