अकोला, 28 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी अकोल्यातील तेल्हार तालुक्यातील तळेगाव इथं एका तरुणीवर विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, या तरुणीनं विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांना तात्काळ आरोपींना अटक केली आहे. अकोल्यातील या ह्रदयद्रावक घटनेनं सर्व हादरून गेले आहेत. मृतक तरुणीच्या वडिलांनी विनयभंग झाल्याची तक्रार हिवरखेड पोलिसात दिली होती. पीडितेच्या वडिलांनी मुलीवर विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगासह जातीवादी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. वाचा- भिवंडीत बायपास रस्त्यावरील लॉजवर छापा; 3 महिलांची सुटका, दलालांविरोधात कारवाई दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीनं या तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या देण्यास सुरुवात केली. या धमक्यांना घाबरून पीडित तरुणीनं आत्महत्या केली. मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ जणांनाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असून या घटनेमुळे तळेगावात तणाव निर्माण झाला होता. वाचा- एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार, Youtube वर शेअर केला तरुणीचा नंबर तळेगावात मृतक युवतीचा परिवार मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणारा आहे. मुलीच्या आत्महत्येने त्यांच्या परिवारावर दुःखाच डोंगर कोसळला आहे. आरोपीने केलेल्या कृत्यामुळे तरुण मुलीला जीव गमवावा लागल्याने, युवतीच्या परिवारातील रोष अनावर झाला आहे. दोषी सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी, आत्महत्या केलेल्या युवतीच्या आई वडिलांनी केली आहे.