मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार, Youtube वर कॉल गर्ल लिहून शेअर केला तरुणीचा नंबर

एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार, Youtube वर कॉल गर्ल लिहून शेअर केला तरुणीचा नंबर

एका तरुणीचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या मुलानं एकतर्फी प्रेमातून यु-ट्यूबवर फोन नंबर अपलोड करून कॉल गर्ल असे लिहिले.

एका तरुणीचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या मुलानं एकतर्फी प्रेमातून यु-ट्यूबवर फोन नंबर अपलोड करून कॉल गर्ल असे लिहिले.

एका तरुणीचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या मुलानं एकतर्फी प्रेमातून यु-ट्यूबवर फोन नंबर अपलोड करून कॉल गर्ल असे लिहिले.

    चंदीगड, 27 ऑक्टोबर : सध्याच्या इंटरनेटच्या या जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा नंबर शोधता येतो. इंटरनेटचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहे. याच इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याआधी लोकं अजिबात विचार करत नाहीत. अशीच एक घटना पंजाबच्या मोगा जिल्ह्यात समोर आली आहे. जेथे एकतर्फी प्रेमातून एका मुलानं मुलीची बदनामी केली, ती सुद्धा इंटरनेटचा वापर करून. मोगा इथं राहणाऱ्या एका तरुणीचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या मुलानं एकतर्फी प्रेमातून यु-ट्यूबवर फोन नंबर अपलोड करून कॉल गर्ल असे लिहिले. असं करणारा आरोपी गगदीप सध्या कॅनडामध्ये स्थायिक आहे. फोन नंबर अपलोड केल्यानंतर पीडित तरुणीला कॉल येऊ लागले आणि तिला अश्लील प्रश्न विचारले गेले ज्यामुळे पीडित मुलगीही नैराश्यात गेली होती. या तरुणीवर अखेर उपचार करावे लागले, त्यानंतर मोहाली सायबर क्राइममध्ये तिने तक्रार दाखल केली. प्रदीर्घ तपासणीनंतर आता मोगा येथे सायबर क्राईमने गगदीपविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा-वा रे पठ्ठ्या! Youtube वर व्हिडिओ पाहून ATM मशीन फोडत होता उच्चशिक्षित तरुण! पीडित तरुणीने सांगितले की, गगदीप हा त्याच्याच शेजारी राहतो व तिच्याबरोबर दहावीत होता. गगदीप तिचा पाठलाग करायचा. शेजारीच राहत असल्यामुळे तिने अनेकदा त्याची तक्रारही केली. पण त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही आणि मस्करी करू लागले. काही वर्षांनी गगदीप कॅनडाला गेला आणि तिथे गेल्यानंतरही तो पीडितेला त्रास देत राहिला. वाचा-पत्नीनं प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, कामगारांना घरात सापडला सांगाडा पोलिसांना दाखल केला गुन्हा या प्रकरणात, मोगा सायबर क्राइमचे डीएसपी सुखविंदर यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरुन कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर लोकांना अपील करण्यात आली आहे की, कोणत्याही माहिती शिवाय फ्रेंड रिक्वेस्टची एक्सेप्ट करू नका. त्याच वेळी ते म्हणाले की जर कोणाला आपल्याबरोबर घेतलेला फोटो फेसबुकवर घ्यायचा असेल तर प्रथम त्या मित्राला कॉल करा आणि त्याने हा फोटो मागितल्याचे स्पष्ट करा.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cyber crime, Youtube

    पुढील बातम्या