JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शरद पवार-गो बॅक' अहमदनगरमध्ये कुणी केली घोषणा, काय आहे प्रकरण?

'शरद पवार-गो बॅक' अहमदनगरमध्ये कुणी केली घोषणा, काय आहे प्रकरण?

पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे.

जाहिरात

पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 06 मार्च : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला पारनेर दौऱ्यावर येणार आहेत. मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव आणि पुर्नर्जीवन समितीने विरोध दर्शविला आहे. कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे शरद पवारांचाच हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. याबाबत कारखाना बचाव समितीने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. पारनेर बचाव समितीने पवारांना लिहिलेल्या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत एकूण 25 प्रश्न उपस्थित केले आहे. या प्रश्नाचा खुलासा दौर्‍यापूर्वी पवारांनी करावा असं या पत्रात म्हटलं आहे. या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न दिल्यास पवारांच्या दौर्‍यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली जाईल असा इशारा कारखाना बचाव समितीकडून देण्यात आला. (‘हिंमत असेल तर….’, मोदींचं नाव घेत ठाकरेंनी भाजप-शिंदेंना दिलं चॅलेंज) पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाने विक्री करून शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे माजी खासदार विदुरा नवले यांनी तो बळकावल्याचा कारखाना बचाव समितीचा आरोप आहे. पारनेर विकत घेणारी क्रांती शुगर कंपनीने गेल्या 7 ते 8 वर्षांपासून उसाला सर्वात कमी भाव देवून पारनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे समितीचे म्हणणं आहे. ( आम्हालाही मुख्यमंत्री बनायचंय’ बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा ) तसंच, पारनेर कारखान्याच्या उर्वरीत मालमत्ता हडपण्यावर त्यांचा डोळा आहे. पारनेर कारखाना विक्रीतून उरलेली रक्कम, दीडशे एकर संपादित जमिनीचा मोबदला पारनेरला मिळू दिला जात नाही. पोलिसांकडून न्यायालयात खोटा चौकशी अहवाल सादर करणे, शासनाकडील दाखल असलेला पुर्नजीवन प्रस्ताव मंजूर करण्यास हस्तक्षेप करणे, प्रशासनाकडून अवसायक न हटवणे यामागेही पवारांचा हात असल्याचे बचाव समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे कारखाना बचाव समितीने त्यांना कारखाना कार्यक्षेत्रात येण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या