मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'हिंमत असेल तर....', मोदींचं नाव घेत ठाकरेंनी भाजप-शिंदेंना दिलं चॅलेंज

'हिंमत असेल तर....', मोदींचं नाव घेत ठाकरेंनी भाजप-शिंदेंना दिलं चॅलेंज

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच जाहीर सभा घेतली आहे.

खेड, 5 मार्च : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच जाहीर सभा घेतली आहे. कोकणातल्या खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची तोफ भाजप तसंच एकनाथ शिंदेंवर धडाडली आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप तसंच एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे.

'महाराष्ट्र गुलामगिरी सहन करणार नाही. नुसतं मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मत मागून दाखवा. बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मागून दाखवा. मोदींच्या नावाने मत मागून दाखवा. हिंमत असेल चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात या, मी मशाल घेऊन मैदानात येतो. निवडणुकीला सामोरं जा,' असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदेंना दिलं आहे.

'देशाचे स्वातंत्र्य गोमूत्र शिंपडून मिळालं का? देश म्हणजे दगड धोंडे नाही, देशाचं स्वातंत्र्य गोमूत्र शिंपडून मिळालं नाही. स्वातंत्र्य सैनिकांनी रक्ताचा अभिषेक करून स्वातंत्र्य मिळवलं आहे.भारत मातेला यांच्या गुलामगिरीत अडकू देणार नाही, अशी शपथ घ्या, नाहीतर 2024 ची लोकसभा निवडणूक शेवटची असेल. देशात हुकूमशाही येईल,' असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

'हातात धनुष्यबाण घ्या, पण कपाळावर गद्दार हे पुसलं जाणार नाही. आशीर्वाद यात्रा काढत आहेत, चोरांना आशीर्वाद देणार का? भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधी साधू दिसतात. पंतप्रधानांना मी पत्र लिहिलं आहे, चौकशीचा ससेमिरा लावला जातोय. दमदाटी भीती दाखवून पक्षात घ्यायचे. विरोधी पक्षात असणारे भ्रष्टाचारी. आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. उद्या दिवस फिरले की तुमची काय हालत होईल पाहा,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली, निवडणूक आयोगाच्या नाही. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. निवडणूक येऊद्या त्यांना ठेचून टाकू. शिवसेना आमची आई आहे. ज्यांना मोठं केलं त्यांनी आपल्या आईवर वार केले. लाज वाटत नसेल तर तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा आणि मैदानात या, असं चॅलेंजही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray