JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'आपल्याला कोणी उठवू नये..' खुर्ची नाट्यावर भाजप नेते राम शिंदे यांचं स्पष्टीकरण, म्हणाले ती चूक..

'आपल्याला कोणी उठवू नये..' खुर्ची नाट्यावर भाजप नेते राम शिंदे यांचं स्पष्टीकरण, म्हणाले ती चूक..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर आमदार राम शिंदे यांची मान-अपमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं.

जाहिरात

राम शिंदे यांचं स्पष्टीकरण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 27 मे : काल (26 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी फडणवीसांसमोरच मान-अपमान नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं. बैठकीवेळी स्टेजवर खुर्ची न मिळाल्यानं भाजप आमदार राम शिंदे चांगलेच नाराज झाले. ते थेट स्टेजवरून निघाले. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा बोलावून घेत खुर्चीची व्यवस्था करण्यात आली. या घटनेवर आमदार राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण स्टेजवरुन खाली का गेलो? याचं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे. काय आहे प्रकरण? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आढावा बैठकीदरम्यान भाजप आमदार राम शिंदे यांना खुर्ची न मिळाल्याने ते स्टेजवरून खाली जात असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना पुन्हा स्टेजवरती बोलावलं. त्यावेळी खुर्ची नाट्य रंगल्याचा पाहायला मिळालं होतं. याबाबत भाजप आमदार राम शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, मला वाटतं की प्रशासनाने तो कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी त्यांना किती आमदार उपस्थित राहणार हे प्रशासनाने अगोदरच विचारपूस करणे आवश्यक होतं त्यानुसार नियोजन करण्याची गरज होती परंतु आमदारांची संख्या जास्त झाली आणि मला बसायला जागा मिळाली नाही आणि म्हणून साहजिकच एखाद्या जागेवर बसलो तर आपल्याला कोणी उठवू नये असा माझा मूळ स्वभाव असल्या कारणाने मी जागा शिल्लक नसल्या कारणाने खाली चाललो असताना उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी मला बसायची व्यवस्था केली परंतु प्रशासन या बाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे ही चूक अनावधानाने झाली असावी यापुढे प्रशासन काळजी घेईल अस मला वाटत असे राम शिंदे म्हणाले. वाचा - आघाडीत पुण्यानंतर कोल्हापुरात ठिणगी? दोन्ही जागेवर ठाकरेंचा दावा; राष्ट्रवादीची चिंता वाढली घटनेची राज्यभर चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच हे मानापमान नाट्य घडल्यानं या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी खुर्ची न मिळाल्यानं राम शिंदे नाराज झाले. ते स्टेजवरून निघून चालले होते. मात्र त्यांना फडणवीसांनी पुन्हा बोलावलं. त्यानंतर राम शिंदे यांना स्टेजवर खुर्ची देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या