JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Monsoon Update: मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट; आज महाराष्ट्राच्या 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट; आज महाराष्ट्राच्या 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून मान्सूनबाबत नवी अपडेट जारी करण्यात आली आहे. नव्या अंदाजानुसार आज राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

जाहिरात

राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जून : भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजनुसार आज गरमीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहून काही राज्यात पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजनुसार 19 जून ते 22 जून दरम्यान दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारतातील काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. आज दक्षिण -पूर्व राजस्थान आणि मेघालयाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रिवादळ बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राजस्थानमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजनुसार आज पश्चिम राजस्थान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे गुजरात, केरळ, आणि तामिळनाडूमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तराखंडमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Weather Update: जून महिना कोरडाच? पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात काय स्थिती? भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मध्य महराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस पुन्हा एकदा उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. मान्सूनच्या वाटचालीला बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका बसला. मात्र आता बिपरजॉय चक्रिवादळाचा प्रभाव कमी झाला असून, मान्सूनसाठी अनुकूल वातावर निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या