JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / समृद्धी की मृत्यूचा महामार्ग? 100 दिवसात 900 अपघात, मृतांची आकडेवारी अक्षरश: हादरवणारी...

समृद्धी की मृत्यूचा महामार्ग? 100 दिवसात 900 अपघात, मृतांची आकडेवारी अक्षरश: हादरवणारी...

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांची आकडेवारी खरंच हादरवणारी आहे.

जाहिरात

समृद्धी महामार्ग भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जुलै : मागच्या वर्षी 11डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या भागाचे उद्धाटन करण्यात आले. मात्र, हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत याठिकाणी शेकडो अपघात झाल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक म्हणजे त्यात आतापर्यंत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या नुकत्याच केलेल्या स्टडीनुसार, समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या पहिल्या 100 दिवसांत, याठिकाणी अंदाजे 900 अपघात झाले आहेत. यामध्ये काही अपघात अत्यंत भीषण होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 11डिसेंबर 2022 ते 20 मार्च 2023 पर्यंत, या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे तब्बल 31 जणांचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. यानंतर आज मध्यरात्रीसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात घडला आणि या भीषण अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. दरम्यान, आतापर्यंत या समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातांपैकी काही प्रमुख अपघात पाहूयात. 1. समृद्धी महामार्गावर 12 मार्च 2023 रोजी एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाले होते. लोकार्पण झाल्यापासून समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात मानला गेला होता. मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेली इर्टिगा गाडी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांला अत्यंत वेगाने धडकली. यामुळे ती थेट हवेत उडाली आणि तीन-चार पलट्या मारुन थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटली. एखाद्या सिनेमातील दृश्य वाटावा इतका हा अपघात इतका भयानक होता असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले होते. 2. मार्च महिन्यामध्ये आणखी एक भीषण अपघात या समृद्धी महामार्गावर झाला होता. यामध्ये चार भावांचा मृत्यू झाला. काकांच्या अत्यविधीला तेलंगणा इथं गेलेले कुटुंबीय सूरतला जात असताना गाडीचा अपघात झाला. यात तिघेजण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर करमाड-शेकटा गावाजवळ पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. 3. 7 मार्च रोजी या समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली होती. ट्रक आणि कारच्या या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगाव जवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारणे समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. यात पती-पत्नी आणि एक लहान मुलगा जागीच ठार झाला तर दोन मुले जखमी झाले आहेत. हेही वाचा -  Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवास करताय, तर आधी ही काळजी घेणे महत्त्वाचे 4. 22 जानेवारी रोजीही समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला होता. कार डिव्हायडरला धडकून झालेल्या या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला होता. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले होते. धामणगाव रेल्वे तालुका परिसरात हा अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. 5. यानंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात म्हणजे आज मध्यरात्री समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात घडला. या भीषण अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. यामध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. अपघाताची कारणे - महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्येही काही माहिती समोर आली. वाहन चालवताना डुलकी लागणे, शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकवा जाणवणे, प्रवासात उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन वाहनाचे टायर फुटणे, वाहनाचा अतिवेग, प्राणीमध्ये येणे, तांत्रिक बिघाड, ब्रेक डाऊन झाल्याने तर इतर काही कारणांमुळे हे अपघात होत असल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या