जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवास करताय, तर आधी ही काळजी घेणे महत्त्वाचे

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवास करताय, तर आधी ही काळजी घेणे महत्त्वाचे

समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्ग

गेल्या अनेक महिन्यांपासून समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले. या अपघातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळे आता यानंतर आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

  • -MIN READ Buldana,Maharashtra
  • Last Updated :

बुलढाणा, 1 जुलै : बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात घडला आणि या भीषण अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. यामध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

News18लोकमत
News18लोकमत

गेल्या अनेक महिन्यांपासून समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले. या अपघातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळे आता यानंतर आता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. म्हणून या महामार्गावर प्रवास करताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. लांबचा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी आधी टायरची साइड वॉल चेक केली पाहिजे. वाहनाचे अलायमेंटसुद्धा नीट तपासले पाहिजे. अन्यथा त्याचा परिणाम टायर आणि इंजिनवर होतो. वाहन चालवताना 100 ते 150 किलोमीटरमध्ये 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा, असेही तज्ञ सांगतात. साधी हवा नको तर नायट्रोजनची हवा भरा - समृध्दी महामार्गावर प्रवास करायचा असेल तर आता वाहनांचे टायर चांगले असण्याची गरज आहे. नागरिक प्रवासापूर्वी वाहनातील टायरमध्ये साधी हवा भरतात. टायरच्या हवेमध्ये 78 टक्के नायट्रोजन, 21 टक्के ऑक्सिजन आणि एक टक्का इतर वायू असतो. तर वाहनांमध्ये किमान 32 ते 33 बार हवा भरली जाते. मात्र, वाहन अधिक वेळ चालविल्यामुळे टायरमधील हवा पसरते. त्यामुळे टायरमध्ये भरलेली हवा ही 45 ते 50 पर्यंत पोहोचते. म्हणून टायर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शकत्यो वाहन चालकांनी नायट्रोजनची हवा भरावी. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 26 जणांचा मृत्यू -  बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात घडला आणि या भीषण अपघातात तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृध्दी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. यामध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात