मुंबई, 02 एप्रिल : एखाद्या बंद खोलीत तुम्ही फार फार तर कितीवेळ राहू शकता… फार फार दिवसातील काही मोजकेच तास. त्यानंतर मात्र तर जीव गुदमरल्यासारखा होईल. खोलीत अशी अवस्था मग विचार करा शवपेटीत एखाद्या व्यक्तीला जिवंत ठेवलं तर… असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. ज्यात एका व्यक्तीला जिवंत शवपेटीत ठेवण्यात आलं, तेसुद्धा तब्बल 50 तास (Man buried alive in coffin for 50 hours). शवपेटीत इतके तास राहण्यासाठी कोण बरं तयार होईल. कुणीच नाही. पण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेक युझर्स अशक्यही शक्य करून दाखवतात. जीवघेणी कृती करताना दिसतात. असाच प्रयत्न केला केला तो युट्यूबर मिस्टर बिस्टने. त्याने स्वत:ला शवपेटीत तब्बल 50 तास जिवंत कोंडून घेतलं. त्याचा लाइव्ह व्हिडीओही केला.
जवळपास 7 फूट लांब आणि 4 फूट रुंद शवपेटी आहे. मिस्टर बिस्ट शवपेटीत जातो. त्याला त्यामध्ये बंद केलं जातं. फक्त शवपेटीत ते बंद होत नाहीत तर वरू मातीही टाकली जाते. म्हणजे एखादा मृतदेह पुरावा तसंच बिस्टला जिवंत पुरलं. हे वाचा - VIDEO - 50 फुटांवरून बर्फ कोसळला, चालू गाडीतच बायकोला सोडून पळाला नवरा आणि… व्हिडीओत पुढे पाहू शकता या शवपेटीत एक कॅमेराही लावण्यात आला आहे. सोबत मिस्ट बीस्टला एक वायरलेस फोनही देण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिस्ट बाहेर असलेल्या त्याच्या मित्रांना दिसतो, वायरलेस फोनच्या माध्यमातून तो त्यांच्याशी बोलतो. शिवाय मिस्टर बिस्टला खाण्यासाठी काही पदार्थ, पाण्याची बाटली आहे आणि रिकाम्या बाटलीतच त्याने लघवीही केली आहे. त्याचे मित्रही त्याला जिथं दफन केलं आहे, त्या जागेवर काही ना काही एक्सपरिमेंट्स करताना दिसतात. असे तब्बल 50 तास तो या शवपेटीत बंद राहतो. अवघ्या 12 मिनिटं 39 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही हादरून झाल. व्हिडीओत तुम्हाला पाहायला आणि ऐकायला येईल की मिस्टर बिस्ट यांची अवस्था कशी झाली आहे. आपल्याला काय त्रास होत आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. तो म्हणाला, माझ्या पाठीत वेदना होत आहे. मला क्लस्ट्रोफोबिकसारखं वाटतं आहे, मला खूप उकडतं आहे. हे वाचा - माणसालाही लाजवेल असं काम; हुश्शार कावळ्याचा VIDEO VIRAL अखेर 50 तास पूर्ण होतात आणि इतका वेळ शवपेटीत बिनधास्त राहणारा आणि हसणाऱ्या बिस्टला रडूच कोसळतं. आपल्याला काहीच झालं नाही, आपण जिवंत आहोत, आता आपण बाहेर पडणार हा विचारच त्याला सुखावणारा असतो आणि त्यामुळेच त्याच्या डोळ्यातून पाणी येतं.