50 फुटांवरून गाडीवर बर्फ कोसळताच बिथरला; चालू गाडीतच बायकोला सोडून पळाला नवरा आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

50 फुटांवरून गाडीवर बर्फ कोसळताच बिथरला; चालू गाडीतच बायकोला सोडून पळाला नवरा आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO

नवरा-बायको गाडीत बसताच भलामोठा बर्फाचा तुकडा गाडीवर येऊन (ice block fell on the car) आदळतो.

  • Share this:

मॉस्को, 01 एप्रिल : जेव्हा संकट येतं, तेव्हाच खरं माणसाचं खरं रूप समोर येतं असं म्हणतात. असंच काहीसं दिसलं ते रशियात (Russia). जिथं एका कारवर भलामोठा बर्फाचा तुकडा पडला (ice block fell on the car) आणि त्यावेळी गाडीतील व्यक्ती आपल्या बायकोला चालत्या गाडीतच ठेवून बाहेर पडली. रशियातील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

रिपोर्टनुसार कोकातील आर्कटिक चौकीजवळील एका इमारतीखाली ही कार उभी होती. त्यात एक पुरुष आणि एक महिला येऊन बसतात. हे दोघंही नवरा बायको असल्याचं सांगितलं जातं आहे. ते गाडीत बसून गाडी सुरू करतात इतक्यात वरून एक भलामोठा बर्फाचा तुकडा त्यांच्या कारवर कोसळतो. तब्बल 50 फूट उंचीवरून वेगाने हा बर्फाचा तुकडा खाली आलेला असतो. तो थेट आदळतो तो कारच्या विंडस्क्रिनला.

ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत पाहू शकता गाडीत बसलेला नवरा एका दरवाजातून लगेच बाहेर येतो. त्यावेळी त्याची बायको मात्र गाडीतच असते.

हे वाचा - क्या बात है! जणू काही कापूसच, इतक्या सहज उचलून नेला Gas Cylinder; पाहा VIDEO

आपला जीव वाचवण्यासाठी तो कारमधून लगेच बाहेर पडतो. त्यानंतर काही वेळाने त्याची बायको दुसऱ्या दरवाजातून बाहेर येतं. पण त्यावेळी कार सुरूच असते. महिला ब्रेक मारण्याचा, गिअर स्विच करण्याचा प्रयत्न करत असते. पण कार नंतर आपोआप मागे जाते. जणू काही कार डेंजर झोनमधून स्वतःच बाजूला हटते आहे. त्यावेळी महिलेचा नवरा इतका घाबरलेला दिसतो की तो इथं तिथं पळू लागतो.

हे वाचा - उठ ना रे! बहिणीची आर्त हाक ऐकून पुन्हा जिवंत झाला मृत भाऊ; पाहा चमत्कारिक VIDEO

काही वेळासाठी दोघंही दुकानात जाऊन आलेले असतात आणि आपल्या कारमध्ये बसून तिथून निघणार तितक्या ही दुर्घटना घडली. सुदैवाने दोघांनाही काही दुखापत झालेली नाही, आपला जीव वाचवण्यात ते यशस्वी झाले.

Published by: Priya Lad
First published: April 1, 2021, 5:40 PM IST

ताज्या बातम्या