मुंबई, 02 एप्रिल : माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे असं म्हटलं जातं. पण अनेकदा माणसांना जे समजत नाही ते मुक्या जीवांना समजतं. बहुतेक वेळा माणसांच्या केलेल्या चुका पशू-पक्षीच सुधारताना दिसतात. सध्या अशाच एका कावळ्याचा (Crow video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. जो पाहून आपण प्रत्येक माणसाला आपली लाज वाटेल. त्याची मान शरमेनं खाली झुकेल.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी कावळ्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा असा हा व्हिडीओ आहे.
This crow knows that humans have lost the sense of shame pic.twitter.com/9ULY7qH4T2
— Susanta Nanda IFS (@susantananda3) April 1, 2021
व्हिडीओत पाहू शकता एक कावळा जमिनीवर पडलेला कचरा जमा करून चक्क कचऱ्याच्या डब्यात टाकतो आहे. कावळ्याला जमिनीवर पडलेले काही कागदाचे बोळे दिसतात आणि समोर एक कचऱ्याचा डबा. मग काय कावळा लागतो कामाला एकेएक करत तो जमिनीवरील कागदाचा प्रत्येक बोळा उचलतो आणि कचऱ्याच्या डब्यात टाकतो.
हे वाचा - क्या बात है! जणू काही कापूसच, इतक्या सहज उचलून नेला Gas Cylinder; पाहा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता तिथंच एक माणूसही उभा दिसतो आहे. त्या माणसाला जमिनीवर पडलेला हा कचरा दिसत असूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण या कावळ्याने मात्र असं काम केलं, जे पाहून प्रत्येक माणसाला त्याच्या चुकांची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
हे वाचा - वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन; एक्सरसाइज करतानाचा VIDEO VIRAL
स्वच्छता राखणं किती महत्त्वाचं आहे हे कावळ्यालासुद्धा समजलं, मग तुम्हाला का नाही? त्यामुळे किमान आतातरी हा व्हिडीओ पाहून स्वतःमध्ये बदल करा. परिसर स्वच्छ ठेवा आणि हो महत्त्वाचं म्हणजे ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून प्रत्येक जण हा व्हिडीओ पाहेल आणि आपल्या चुका सुधारेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos