JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुमच्यावरही digital detox होण्याची वेळ आलीय का बघा; मोबाईल-सोशल मीडियानं हे मानसिक आजार वाढलेत

तुमच्यावरही digital detox होण्याची वेळ आलीय का बघा; मोबाईल-सोशल मीडियानं हे मानसिक आजार वाढलेत

सोशल मीडियाच्या युगात आपण आपले मन, मानसिक आरोग्य कसे निरोगी ठेवू शकतो? याविषयी जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला डिजिटल डिटॉक्सच्या (digital detox) या 4 वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करावा लागेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 एप्रिल : मोबाईल फोन आणि सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, ‘अति तेथे माती’ या म्हणीप्रमाणे या गोष्टी आता आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू लागल्या आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया हा आजच्या काळातील सर्वात मोठा शत्रू बनला आहे. त्याच्या अतिवापराने आपण मानसिक आजारी पडू शकतो. अमेरिकेतील सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीतील (San Diego State University) मानसशास्त्राचे प्राध्यापक जीन ट्वेंज यांच्या मते, फोनचा निळा प्रकाश रात्रीच्या वेळीही आपल्या मेंदूला दिवस असल्याचा अनुभव देत असतो. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधील प्रोफेसर अॅडम अल्टर सांगतात की, टेक कंपन्या लोकांनी फोन अधिक वापरण्यास भाग पाडण्यासाठी वर्तणूक मानसशास्त्र (बिहेवियरल साइकोलॉजी) वापर करतात. सोशल मीडियाच्या युगात आपण आपले मन, मानसिक आरोग्य कसे निरोगी ठेवू शकतो? याविषयी जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला डिजिटल डिटॉक्सच्या (digital detox) या 4 वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करावा लागेल. मॉर्निंग- ऑफ द नोटिफिकेशन कित्येक लोक सकाळी उठल्याबरोबर फोन पाहतात. त्यांना त्यांचे संदेश, ईमेल किंवा सोशल मीडिया प्रोफाइल तपासण्याची सवय लागलेली असते, ही चुकीची आहे. सकाळी उठल्याबरोब फोन हातात घेणं अजिबात योग्य नाही. त्याऐवजी वर्तमानपत्र वाचा. व्यायाम करा किंवा चालायला जा. फोकस सेट करा. किमान सकाळच्या वेळी तरी नोटिफिकेशन्स बंद ठेवा जेणेकरून फोन पुन्हा पुन्हा आवाज करणार नाही. दुपारच्या जेवणाच्या वेळेत फोनचा नियम - दुपारच्या जेवणाचा ब्रेक तुम्हाला एकाग्र राहण्यास मदत करतो. कौटुंबिक संबंध दृढ करण्यासाठी या वेळेचा उपयोग करा. तुम्ही कुटुंबासोबत असाल तर फोनमध्ये डोकं घालू नका. जर तुम्ही ऑफिसमध्ये दुपारचे जेवण करत असाल तर सहकाऱ्यांसोबत गप्पा-गोष्टी करत जेवण करा. मोबाईल न उचलण्याचा हा नियम सोबतच्यांनाही लागू करा. संध्याकाळी - फोन फ्लाइट मोडवर संध्याकाळी फिरायला जा. मुलांबरोबर खेळा, मुलांसोबत राहणे हा सर्वात मौल्यवान वेळ आहे. यावेळी मोबाईल वापरू नका. फोटो काढण्यासाठी फोन सोबत ठेवायचा असेल तर तो फ्लाइट मोडवर ठेवा. हे वाचा -  10 वर्षात लाखों भारतीय झालेत HIV पॉजिटिव, बचावासाठी या टिप्स नेहमी ध्यानात ठेवा रात्री - ऑडिबल अ‌ॅप्स झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल-गॅजेट वापरणे थांबवा. याचा अर्थ तुम्ही फोन स्क्रीनसमोर नसावे. तरीही तुम्हाला फोन सोबत ठेवण्याची सवय असेल, तर Audible अॅप्स वापरा. गाणी ऐका, कथा ऐका, याद्वारे तुम्ही मनोरंजन करू शकाल आणि त्याचबरोबर फोनच्या निळ्या प्रकाशापासूनही लांब राहू शकाल. झोपण्यापूर्वी फोन तुमच्यापासून लांब ठेवा. डिटॉक्स का आवश्यक आहे काही वेळ फोन न मिळाल्यास तुम्हाला अस्वस्थता आणि तणाव जाणवू लागतो. वारंवार काही मिनिटांनंतर फोन चेक करण्याची सवय लागली असल्यास. सोशल मीडियाचा वापर केल्यानंतर तुम्हाला अस्वस्थता, निराशा आणि नैराश्य जाणवू लागतं. किंवा फोन चेक न केल्याने मागे पडण्याची भीती वाटणे. असा प्रकार तुमच्या बाबतीत होत असेल तर समजून घ्या की, तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे. हे वाचा -  सोशल हेल्थ म्हणजे काय? खराब सोशल हेल्थचे परिणाम, चांगल्या सोशल हेल्थसाठी उपाय नकारात्मकता वाढते - झोपताना सोशल मीडियाचा वापर केल्याने झोपेची समस्या वाढते. अप्लाइड रिसर्च इन क्वालिटी ऑफ लाइफ या जर्नलमधील संशोधनात सांगितलेल्या माहितीनुसार, इंटरनेट आणि मोबाईलचा अधिक वापर केल्याने कामाचा ताण आणि जास्त काम करत असल्याची भावना उगीचच वाढते. नोकरीतील समाधान कमी होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या