नवी दिल्ली, 28 एप्रिल : नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षांत भारतात 17 लाख लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले आहेत. या आकड्यावरून हे सहज समजू शकते की विषाणूची तीव्रता आणि प्रतिबंध किती (Useful Tips To Avoid HIV) महत्त्वाचा आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह होऊ नये, यासाठी भारत सरकारकडून वारंवार जनजागृती केली जात असते. विविध गोष्टींमधून लोकांना या जीवघेण्या आजारापासून बचावासाठी प्रयत्न केले जातात. HIV काय आहे झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर हल्ला करतो आणि आणि आयुष्यभर व्यक्तीला त्रस्त करत राहतो. चांगल्या उपचारांमुळे एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) नियंत्रणात आणता येत असला तरी त्यातून पूर्णपणे सुटका होणे शक्य नाही. म्हणजे या विषाणूची बाधा झाल्यानंतर माणूस पुन्हा त्यातून बरा होत नाही. सकारात्मकता आणि योग्य औषधोपचाराने मदतीने आपण जास्त काळ चांगले जीवन जगू शकतो. एचआयव्हीचा प्रसार कसा होतो? हा विषाणू रक्त, वीर्य, योनीमार्गातील द्रव किंवा आईच्या दुधाद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. एचआयव्ही झाल्यानंतर 2 ते 4 आठवड्यांनंतर, व्यक्तीच्या शरीरात फ्लू सारखी लक्षणे दिसतात. काही लोकांना त्याची लक्षणेही माहीत नसतात. पण तुम्हाला काहीही त्रास वाटत असल्यास, घाबरून न जाता, तुम्ही प्रथम तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमची स्थिती सांगा. हे वाचा - तुमचं मूल अजून लाळ गाळतंय का? समज-गैरसमज खूप आहेत, नेमकी माहिती समजून घ्या एचआयव्ही टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा - एचआयव्ही रोखण्यासाठी, अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंधादरम्यान कंडोम वापरण्यास विसरू नका. याशिवाय संबंध बनवण्यापूर्वी सावध राहा. यावर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनैतिक संबंध ठेवणे टाळा. तसेच अधुनमधून HIV आणि STI चाचण्या करत राहिल्या पाहिजेत. हे वाचा - Gourd benefit: दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत 5 फायदे; अनेक आजार आपोआप कमी होतात सिरिंज पुन्हा वापरल्यानं - हॉस्पिटलमध्ये रक्त काढण्यासाठी जी सुई वापरली जात आहे ती नवीन असावी, म्हणजेच अनेकांसाठी एकच सिरिंज वापरली जाऊ नये. यासोबतच अल्कोहोलचा ओव्हरडोज घेऊ नका. असे केल्याने तुम्ही तुमची संवेदना गमावू शकता आणि संरक्षण न वापरता (कंडोम किंवा इतर साहित्य) नातेसंबंध ठेवण्यासाठी प्रेरित होऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.