नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : ‘तू सिंगल का आहेस?’ हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर, तुमचं उत्तर काय असेल? तुमचं उत्तर काहीही असो, पण सिंगल असण्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कॉमन आहेत. त्यामुळं तुम्ही ‘सिंगल’ असाल तर, काही बाबी समजून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तुमच्या विरोधात जाणारे काही मुद्दे तुम्ही समजून घेतले (Reason for being single) पाहिजेत. मी किती दिवसांपासून सिंगल आहे ‘अरे केव्हापासून मी सिंगल आहे’ किंवा ‘मी अजूनही सिंगल आहे’ यासारखे डायलॉग तुम्हाला इतरांसमोर ‘कूल’ बनवण्यापेक्षा तुमच्या विरोधात जातात. कारण, यामुळं लोकांना तुमच्याबद्दल असं वाटतं की कोणीही तुम्हाला ‘डेट’ करू इच्छित नाही. मी असं काहीही केलेलं नाही हिंदुस्थान टाइम्स ने दिलेल्या बातमीनुसार, कोणत्याही गोष्टीबाबत फार बचावात्मक असण्याची गरज नाही. काही वेळा, तुम्हाला तुमच्या चुका मान्य कराव्या लागतात आणि इतरांचं म्हणणं ऐकावं लागतं. कारण यामुळं अनेक बाबींवर उपाय (solution) निघू शकतं. सदैव सत्य नाकारणार्या व्यक्तीसोबत राहावं, असं कोणालाही वाटत नाही. त्यामुळं आपल्याकडून काही चुकल्यास ते मान्य करण्याचा आणि चूक सुधारण्याचा मोठेपणा दाखवावा. अन्यथा, लोक आपल्याला टाळू लागतात. मला सिंगल राहायला आवडत नाही तुम्ही नेहमी सिंगल असल्याबद्दल सर्वांजवळ रडगाणं गात असाल तर ही सवय लगेच बंद करा. कारण यामुळं लोक वैतागतात (इरिटेट होतात). प्रेम ही एक भावना आहे ज्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. अशा वेळी प्रेम मिळवण्यासाठी किंवा मिळत नाही म्हणून नेहमी रडणे योग्य नाही. आपण यासारख्या वक्तव्यांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. हे वाचा - Grapes: गोड लागली म्हणून द्राक्षे जास्त खाऊ नका; त्याचे हे साईड इफेक्ट समजून घ्या ‘सर्वोत्तम’ असं काहीही नसतं सर्वोत्तम मिळवण्याची इच्छा किंवा अपेक्षा करत राहिलात तुम्हाला नेहमीच त्रास होत राहील. ‘सर्वोत्कृष्ट’ असण्याची कोणतीही व्याख्या नाही, तो फक्त विचार आहे. तसंच कोणीही सर्वोत्कृष्ट असू शकत नाही. तुमच्या अपेक्षा उंच ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या अपेक्षांचं ओझं कोणावरही टाकू नका. त्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे, त्यामध्ये आणि त्यासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. हे वाचा - Relationship Tips : चांगल्या वैवाहिक जीवनासाठी तुमच्या जोडीदारासोबत या गोष्टी करू नये शेअर नेहमी नियम बनवण्याची सवय नेहमी नियमांचं पालन करणार्या व्यक्तीबरोबर राहणं इतर लोकांना खूप पकाऊ वाटू शकतं. नेहमी नियमांना चिकटून राहणं किंवा स्वतःसाठी सीमारेषा तयार करत राहण्यानं तुम्हाला आणि इतरांनाही गुदमरल्यासारखं वाटू लागेल. त्यामुळं सहजतेनं राहण्याचा आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करा. काही नियम स्वतःच्या चांगल्या जीवनासाठी आणि तत्त्वांसाठी, आवडी-निवडींसाठी असणं ठीक आहे. मात्र, प्रत्येक बाबतीत स्वतःकडून आणि इतरांकडून ‘हार्ड अॅण्ड फास्ट’ नियम बनवून ते पाळण्याची अपेक्षा करत राहू नका. आजच्या युगात कोणालाही अशा व्यक्तीसोबत राहावंसं वाटत नाही.