पुणे, 24 जानेवारी : रोजच्या वापरण्यात हमखास लागणारी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा शूज. घरात थंडीपासून किंवा धुळीपासून बचाव करण्यासाठी, कॉलेज आणि ऑफिसमध्ये रोज वापरण्यासाठी, ट्रेकला जाण्यासाठी, प्रवासात फिरताना, लग्नसमारंभात मिरवताना प्रत्येक वेळी आपल्या पायात वेगळे आणि ट्रेंडिंग जोडे असावेत अशी प्रत्येक तरुणींची इच्छा असते. पुण्यात चप्पल आणि शूज हमखास स्वस्तात मिळणाऱ्या ठिकाणाची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. पुणे शहरात तरुणींचे शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून फर्ग्युसन रोड म्हणजेच एफसी रोडची ओळख आहे. याच एफसी रोडवर तुम्हाला स्वस्तामध्ये या वस्तू मिळतील. एफसी रोडवरच्या शिरोळे मार्केट आणि केसरिया मार्केटमध्ये विविध प्रकारच्या सँडल्स, चप्पल उपलब्ध आहेत. या खरेदीसाठी तुम्हाला या मार्केटच्या आतल्या भागात जावं लागेल. स्वस्तात मस्त पर्स मिळण्याची जागा, तरुणींसाठी आहे हक्काचं ठिकाण! Video या मार्केटमध्ये तुम्हाला चक्क 100 रुपयांपासून विविध प्रकारच्या सँडल मिळू शकतात. याच्या क्वालिटीमध्ये विविधता असून त्यानुसार किंमतीमध्ये देखील फरक आहे. सध्या तरुणी वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स आणि शूज वापरतात. ते सर्व प्रकार इथं तुम्हाला पाहाता येतील.
लग्नसराई किंवा एखाद्या इव्हेंटसाठी लागणाऱ्या हेवी लुकच्या सँडल्स इथं अक्षरश: पाचशे रुपयांपासून मिळतात. त्याचबरोबर घरात घालायला लागणाऱ्या चपलांची किंमत ही साठ ते सत्तर रुपये इतकी आहे. सँडल आणि चप्पलच्या क्वालिटीमध्ये इथं विविध प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत. सध्या मल्टी कलर्स सँडल्सचा ट्रेंड असून त्या इथं 300 रुपयांपासून खरेदी करता येतात.
मुंबईतील सर्वात स्वस्त ज्वेलरी मार्केट, लहान उद्योजकांसाठी आहे वरदान! Video
या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या सँडल्सच्या कॉम्बो ऑफर देखील उपलब्ध आहेत. 399 रुपयांमध्ये तीन सँडल किंवा 999 रुपयांमध्ये सँडल, बेली शूज आणि स्पोर्ट शूजचे कॉम्बिनेशन इथं खरेदी करता येते. त्याचबरोबर विविध ब्रँड्सच्या फर्स्ट कॉपी देखील इथं उपलब्ध असून त्या देखील उत्तम क्वालिटीच्या आहेत, अशी माहिती इथं नियमित खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी दिली.

गुगल मॅपवरून साभार