मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mumbai : मुंबईतील सर्वात स्वस्त ज्वेलरी मार्केट, लहान उद्योजकांसाठी आहे वरदान! Video

Mumbai : मुंबईतील सर्वात स्वस्त ज्वेलरी मार्केट, लहान उद्योजकांसाठी आहे वरदान! Video

X
Jewellery

Jewellery wholesale market Mumbai : तुम्ही ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत

Jewellery wholesale market Mumbai : तुम्ही ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी : आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजक होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. त्यामधून हॉटेल, कपडे, ज्वेलरी यासारखे व्यवसाय अनेक जण सुरू करतात. या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी मुंबईमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील व्यावसायिक खरेदी करण्यासाठी येत असतात. तुम्ही ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. या ठिकाणी तुमच्या आवडीचे अनेक दागिने होलसेलच्या भावात मिळतात.

कुठे आहे मार्केट?

मुंबईतील मालाडच्या मार्केटमध्ये सर्व प्रकारची ज्वेलरी मिळते. केसातल्या पिनपासून ते पायातील जोडव्यापर्यंतच्या सर्व वस्तू, फॉर्मल ड्रेसवर घालण्यासाठी कानातले ब्रेसलेट, पारंपरिक कपड्यांवरची मॅचिंग ज्वेलरी असे अनेक ऑप्शन इथं उपलब्ध आहेत. तुम्हाला विक्रीसाठी लागणारं सर्व प्रकार या मार्केटमध्ये मिळतात. या मार्केटमधील मोत्याची नाजूक दागिने विशेष प्रसिद्ध आहेत.

VIDEO : दररोजच्या वापरण्यात येणारं लाटणं कसं बनवितात माहिती आहे का?

काय आहे किंमत?

मालाड येथील या दुकानात होलसेल भावात सगळ्या प्रकरची ज्वेलरी मिळते. ज्यांना ज्वेलरीचा व्यवसाय करायचा असतो असे लोकं येथे भेट देतात. 1 रुपयांपासून 350-400 रुपयांपर्यंत ज्वेलरी मिळते. ही ज्वेलरी खरेदी करताना जास्त प्रमाणात खरेदी करावी लागते. तसेच तुम्ही फोन करून ऑर्डर केल्यास कुरिअर सेवा सुद्धा पुरवली जाते.

काय होतो फायदा?

ज्वेलरी व्यवसाय करायचा असल्यास येथून स्वस्त दरात वस्तू घेऊन रिटेलच्या भावाने विकल्यास चांगलाच आर्थिक फायदा होतो. आमच्याकडून विदेशात सुद्धा ज्वेलरी पुरवली जाते तसंच अनेक दूर दूरच्या राज्यांमधून ऑर्डर घेतली जाते. असं रुची क्रिएशनचे मालक चिराग गाला यांनी सांगितलं.

गुगल मॅपवरून साभार

First published:

Tags: Jewellery shop, Lifestyle, Local18, Mumbai