मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pune : स्वस्तात मस्त पर्स मिळण्याची जागा, तरुणींसाठी आहे हक्काचं ठिकाण! Video

Pune : स्वस्तात मस्त पर्स मिळण्याची जागा, तरुणींसाठी आहे हक्काचं ठिकाण! Video

X
Best

Best Purse for Ladies :कॉलेजमधील तरुणाईच्या बजेटला परवडतील अशी पॉकेट फ्रेंडली शॉपिंगची ठिकाणं पुण्यात आहेत.

Best Purse for Ladies :कॉलेजमधील तरुणाईच्या बजेटला परवडतील अशी पॉकेट फ्रेंडली शॉपिंगची ठिकाणं पुण्यात आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 22 जानेवारी : जगरभरातील विद्यार्थ्यांना आकर्षिक करणारं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात नेहमीच तरुणाईचा उत्साह पाहायला मिळतो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स, अत्याधुनिक ब्रँड्स पुण्यात आहेत. त्याचबरोबर विशेषत: कॉलेजमधील तरुणाईच्या बजेटला परवडतील अशी पॉकेट फ्रेंडली शॉपिंगची ठिकाणं देखील शहरामध्ये आहेत.

स्वस्तात मस्त खरेदी

पुण्यातील तरुणींच्या शॉपिंगसाठी सर्वात फेमस भाग म्हणून फर्ग्युसन कॉलेज अर्थात एफसी रोडची ओळख आहे.  जगभरातील लेटेस्ट फॅशन इथं तात्काळ आणि बजेटला परवडेल या दरामध्ये खरेदी करता येते. त्यामुळे या भागातील दुकानांमध्ये तरुणींची नेहमीच गर्दी असते. इथं तरुणींना नेहमी लागणाऱ्या पर्स देखील अगदी कमी किंमतीमध्ये मिळतात.

फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या शिरोळे मार्केट आणि केसरी मार्केट अशा दोन मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स खरेदी करता येतात. त्यासाठी तुम्हाला या मार्केटमध्ये थोडं आत जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला अगदी दीडशे रूपयांपासून वेगवेगळ्या पर्स मिळतात. या पर्सच्या क्वालिटीमध्ये विविधता असून त्यानुसार किंमतीमध्येही फरक आहे.

मुंबईतील सर्वात स्वस्त ज्वेलरी मार्केट, लहान उद्योजकांसाठी आहे वरदान! Video

कोणते प्रकार उपलब्ध?

पर्समध्ये क्लचेस, पाऊच, फायबर पर्स, मेकअप बॅग, सॅक कम पर्स, हेवी डिझायनर पर्सेस या सारख्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पर्स इथं मिळतात. त्याचबरोबर एखाद्या लग्नाच्या ठिकाणी किंवा इव्हेंटसाठी सुट होतील अशा हेवी लुकच्या पर्स देखील इथं अगदी पाचशे रूपयांपासून मिळतात. त्याचबरोबर लहान किचन ठेवण्यासाठी लागणारे छोटे पाऊच देखील इथं पन्नास रुपयांपासून उपलब्ध आहेत.

या मार्केटमध्ये काही पर्स कॉम्बो ऑफरमध्येही खरेदी करतात. 699 रुपयांमध्ये 3 किंवा 999 रुपयांमध्ये 5 या प्रकारच्या ऑफर इथं आहेत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरूणींसाठी पर्स, ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी लागणाऱ्या थोड्या मोठ्या पर्सही इथं मिळतात. महिलांना वेगवेगळ्या वस्तू पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या आकाराच्या पर्सचेही इथं अनेक पर्याय आहेत. या प्रकारत 300 ते 800 रुपयांपर्यंत चांगल्या क्वालिटीच्या पर्स इथं उपलब्ध आहेत.

First published:

Tags: Fashion, Lifestyle, Local18, Pune, Shopping