मुंबईतील सर्वात स्वस्त ज्वेलरी मार्केट, लहान उद्योजकांसाठी आहे वरदान!

मुंबईमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील व्यावसायिक खरेदी करण्यासाठी येत असतात. 

तुम्ही ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. 

या ठिकाणी तुमच्या आवडीचे अनेक दागिने होलसेलच्या भावात मिळतात.

कुठे आहे मार्केट?
मुंबईतील मालाडच्या मार्केटमध्ये सर्व प्रकारची ज्वेलरी मिळते.

केसातल्या पिनपासून ते पायातील जोडव्यापर्यंतच्या सर्व वस्तू, फॉर्मल ड्रेसवर घालण्यासाठी कानातले ब्रेसलेट, पारंपरिक कपड्यांवरची मॅचिंग ज्वेलरी असे अनेक ऑप्शन इथं उपलब्ध आहेत. 

तुम्हाला विक्रीसाठी लागणारं सर्व प्रकार या मार्केटमध्ये मिळतात. या मार्केटमधील मोत्याची नाजूक दागिने विशेष प्रसिद्ध आहेत.

काय आहे किंमत?
मालाड येथील या दुकानात होलसेल भावात सगळ्या प्रकरची ज्वेलरी मिळते.

ज्यांना ज्वेलरीचा व्यवसाय करायचा असतो असे लोकं येथे भेट देतात. 

1 रुपयांपासून 350-400 रुपयांपर्यंत ज्वेलरी मिळते.