JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दादर आता विसरा, डोंबिवली सारखं स्वस्त मार्केट कुठेच नाही! कसं ते पाहा हा VIDEO

दादर आता विसरा, डोंबिवली सारखं स्वस्त मार्केट कुठेच नाही! कसं ते पाहा हा VIDEO

Wholesale market in Dombivli : स्वस्त कपडे खरेदी करण्यासाठी नेहमी दादरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही डोंबिवलीमध्येही ही खरेदी करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 6 मे : लग्न असो किंवा मग सण फिरायला जाणे असो किंवा एखादी प्रोफेशनल पार्टी असो कपडे खरेदी ही करावीच लागते. कपडे खरेदी म्हंटल की त्या कपड्यांवरील मॅचींग बांगड्या, कानातले, नेकलेस या सगळ्या वस्तू मुलींच्या खरेदीत ओघाने येतातच. या सर्व वस्तू कमी बजेटमध्ये खरेदी करायच्या म्हटलं की मुंबई तील दादर मार्केटच नाव समोर येतं. मात्र, आता दादरमध्ये जायची गरज नाही डोंबिवलीमध्ये तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता.   कुठे कराल खरेदी? डोंबिवली मधील मधुबन गल्लीमध्ये तुम्ही कपडे, साड्या, वेस्टर्न आऊटफीट, बांगड्या, चपला, दागिने डिझायनर पर्स अशा विविध वस्तूंची तुम्ही स्वस्त दरात खरेदी या ठिकाणी करू शकता. या वस्तूंची किंमत 50 रुपयांपासून सुरु होते तर 2000 रुपयांपर्यंत या ठिकाणी वस्तू मिळतात.

महिलांच्या वस्तूंची प्रसिद्ध गल्ली  मधुबनची ही गल्ली महिलांच्या वस्तूसाठी प्रसिद्ध आहे. आमच्याकडील सर्व वस्तू आम्ही अगदी कमी किंमतीत विकतो. त्यामुळे महिलांना खरेदी करायला ही गल्ली आवडते अशी माहिती येथील विक्रेत्यांनी दिली. काय आहेत वस्तूंच्या किंमती? स्कार्फ - 100 पासून 300 रुपयांपर्यंत वनपिस - 150 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत मेकअप सामान - 50 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत पर्स - 150 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत चप्पल - 50 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत

आईला मदत करताना सुचली कल्पना, 150 प्रकारचे डोसे आणि मेदूवडा-सँडविच विकणारा बिट्टू, Video

संबंधित बातम्या

शॉपिंगनंतर मारा पदार्थांवर ताव  शॉपिंग झाल्यानंतर तुम्ही या गल्लीमध्ये राजू सँडविच आणि महिला बचत गटाचा गरमा गरम वडापाव खाऊ शकता. खाणे झाल्यानंतर लाडाची घट्ट मलईदार कुल्फी सुद्धा या ठिकाणी मिळते.   मधुबन गल्लीत खरेदीसाठी कसे जाल? डोंबिवली स्थानकात उतरल्यानंतर पूर्वेकडे यावे. राम नगरच्या पुलावरून येत असाल तर उतरून डावीकडे वळावे हाकेच्या अंतरावर मधुबन टॉकीज गल्ली आहे. तर मधल्या पुलावरून खाली उतरलाततर समोरच ही गल्ली आहे. सोमवारी या गल्ली मधील सर्व दुकाने बंद असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या