JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Sexual Health : नवीन-नवीनच लग्न झालं असेल तर चुकूनही या 5 गोष्टी खाऊ नका; पश्चातापाची वेळ येईल

Sexual Health : नवीन-नवीनच लग्न झालं असेल तर चुकूनही या 5 गोष्टी खाऊ नका; पश्चातापाची वेळ येईल

effect on Sexual Health : चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी काही गोष्टी आहारात घेणं टाळणे गरजेचे असते. विशेषत: ज्यांचे नुकतेच नवीन लग्न झाले आहे किंवा होणार आहे, त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. काही पदार्थ खाल्ल्याने त्यांचा कामजीवनावर परिणाम होऊ शकतो, त्याविषयी जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जानेवारी : आहार आणि जीवनशैलीच्या सवयींचाही आपल्या लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही नवीन विवाहित असाल किंवा लग्न करणार असाल तर काही गोष्टींचे सेवन टाळा. या गोष्टी खाल्ल्याने तुमचे नुकसान (effect on Sexual Health) होईल. कॉफी झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार जास्त कॉफी प्यायल्याने पुरुषांमध्ये कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन तयार होतो. त्यात कॅफिन असते, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. चीज चीजमध्ये भरपूर चरबी असते. चीज खाल्ल्याने अनेकदा शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन या सेक्स हार्मोन्सची निर्मिती मंदावू शकते. त्यामुळे तुमच्या या महत्त्वाच्या काळात चीजचे सेवन टाळणे. पुदीना श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेकजण पुदिना खातात. परंतु, पुदिन्यात असलेल्या मेन्थॉलमुळे लैंगिक उत्तेजना कमी होऊ शकते, त्यामुळे लग्नानंतरच्या काळात पुदीना खाणं टाळावे. कॉर्नफ्लेक्स कॉर्नफ्लेक्स खाणेही या काळात टाळले पाहिजे, कॉर्नफ्लेक्स शक्तीवर्धक असले तरी लग्नानंतर लगेच त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक ठरू शकते. ते खाल्ल्याने लैंगिक जीवनावर परिणाम होतो. हे वाचा -  लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात सोडा लग्नानंतर कामजीवनावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींमध्ये सोड्याचाही समावेश होतो. सोडा प्यायला तर त्याचा तुमच्या लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. सोडा तुमचे वजन आणि मूड प्रभावित करतो. हे वाचा -  सुकून गेलीत का तुमची महागडी मेकअप प्रोडक्ट्स? फेकून देण्यापूर्वी हे सोपे उपाय करून पुन्हा वापरा (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या