मुंबई, 01 मे : विमानात बसल्यावर जेव्हा आपण इन-फ्लाईट मेनूमधून ऑर्डर करण्याचा विचार करतो तेव्हा सर्व एअरलाइन्समध्ये एक पेय कॉमन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ते पेय पाणी आहे, तर तुमचं उत्तर चुकलं आहे. त्याचं उत्तर टोमॅटो ज्युस असं आहे. अनेक एअरलाइन्सद्वारे दिलं जाणारं हे सर्वाधिक प्रमाणात सेवन केलं जाणारं पेय आहे. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की टोमॅटो ज्युस फ्लाइटमधील सर्वांत लोकप्रिय पेय कसं बनलं? टोमॅटो ज्युस विमानात इतका लोकप्रिय का आहे, हे जाणून घेऊयात. आपण हवेत असताना हवेच्या दाबातील फरक आपल्या चवीच्या सेन्सवर परिणाम करू शकतो. टोमॅटोचा ज्युस प्रवाशांसाठी एक चांगला पेय पर्याय आहे कारण त्याची चव विमान उंचीवर गेल्यावरही तशीच राहते. तसेच टोमॅटो ज्युस हायड्रेशनचा उत्कृष्ट स्रोत आहे. हवाई प्रवास करताना हायड्रेशन गरजेचं असतं, कारण केबिनच्या वातावरणामुळे प्रवासी डिहायड्रेट होऊ शकतात, असं म्हटलं जातं. आणखी एक असा समज आहे की टोमॅटो ज्युसच्या जाहिरातीचं विमान कंपन्या प्रमोशन करतात. टोमॅटोचा ज्युस अनेक वर्षांपासून विमानांमध्ये मेनू ऑप्शन आहे आणि अनेक प्रवाशांना ते ऑर्डर करण्याची सवय लागली आहे. अहवालानुसार, काही एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये ऑर्डर केलेले टोमॅटो ज्युस हे खरोखरच सर्वांत लोकप्रिय पेय आहे. Health Care In Summer : उन्हाळ्यात वारंवार उद्भवतायंत आजार? मग जेवणात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा या व्यतिरिक्त, टोमॅटोच्या ज्युसचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत ज्यामुळे तो प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरतो. त्यात लाइकोपीनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे जळजळ कमी होते आणि हार्ट हेल्थमध्ये सुधारणा होते, तसंच पोटॅशियम आणि मीठासारखे इलेक्ट्रोलाइट्स त्यात असतात, जे फ्लाइटमधील डिहायड्रेशनशी लढण्यास मदत करतात. टोमॅटो ज्युस तुमच्या शरीराची इलेक्ट्रोलाइट्सची गरज पूर्ण करण्यास मदत करू शकतो आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टिने त्यात व्हिटॅमिन सीदेखील जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं नाक, घसा किंवा त्वचा कोरडी पडल्यासारखे वाटत असेल, तर तुम्ही टोमॅटो ज्युसचं सेवन करू शकता. अशा रितीने फ्लाइट्समध्ये प्रवासी टोमॅटोचा ज्युस का मागवतात, यामागची वेगवेगळी कारणं आहेत. प्रवाशांची प्रत्येकाची कारणं वेगळी असली तरी याच सर्व कारणांनी टोमॅटो ज्युसला फ्लाइटमधील सर्वांत लोकप्रिय पेय बनवलं आहे. तुम्हीही पुढच्या वेळी फ्लाइटमधून प्रवास कराल, तेव्हा टोमॅटो ज्युस मागवायला विसरू नका.