पुणे, 20 नोव्हेंबर : पुण्यात (pune) कोरोनाव्हायरसची (coronavirus) दुसरी लाट येण्याचे संकेत असताना काही प्रभागात हर्ड इम्युनिटीची (herd immunity) विकसित झाल्याचे संकेत मिळाले आहे. पुण्यातील 85 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. याचा अर्थ शहरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरसशी लढण्याची क्षमता निर्माण होत आहे. आता हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? ती कशी विकसित होते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? जर एखादा रोग मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचला असेल तर मनुष्याची रोगप्रतिकारकशक्ती रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करते. जे लोक या रोगाची झुंज देतात आणि पूर्णपणे बरे होतात ते त्या रोगापासून इम्युन होतात. म्हणजेच त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होतो आणि त्यांच्यातील अँटीबॉडीज व्हायरससोबत सामना करण्यास तयार होतात. यालाच हर्ड इम्युनिटी म्हणजे संसर्ग रोखण्याची शक्ती म्हणतात. हर्ड इम्युनिटी कशी असते? जेव्हा अधिकाधिक लोक इम्युन होतात. तेव्हा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो. हर्ड इम्युनिटीही रोगाविरुद्ध लढण्यासाठी मदत करते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एडुआर्डो सांचेझ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये देखील याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. हे वाचा - तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देणार CORONA VACCINE; मिळणार आपात्कालीन मंजुरी डॉ. सांचेझ यांनी लिहिलं आहे की, जर एखाद्या भागातील अधिकाधिक लोक व्हायरसशी लढून जिवंत राहण्याची क्षमता निर्माण करत असतील तर मग हा व्हायरस त्या भागातील इतर ठिकाणापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे. मात्र या प्रक्रियेला वेळ लागतो. व्हायरसची लागण झाल्यानंतर किती लोकसंख्याही प्रतिकारक शक्ती निर्माण करते covid-19 च्या तुलनेत समाजातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या ही हर्ड इम्युनिटी निर्माण करते असा अंदाज आहे. तसंच जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार रोगप्रतिकारक शक्तीच्या पातळीवर पोहोचण्यासाठी सुमारे 80 टक्के लोकांना लशीकरण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पाचपैकी चार लोक संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना संसर्ग झालेला नसेल तर हे देखील समूहातून होणाऱ्या हर्ड इम्युनिटीचे संकेत आहेत. हे वाचा - पुणेकरांनो काळजी घ्या! 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन गोवर, गालगुंड, पोलिओ आणि चिकन पॉक्स एकेकाळी असे आजार होते जे प्रत्येकाला होत होते. मात्र आता काही देशांमध्ये ते नाहीसे झाले आहेत कारण की लोकांमध्ये लशीच्या आधारे त्या आजाराशी लढण्याची हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली आहे.