मुंबई, 29 जानेवारी : हल्ली लोकांचे राहणीमान खूप बदलले आहे. बऱ्याचदा स्वस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार डोकं वर काढू लागतात. आताच्या काळात कॅन्सरची प्रकरणेही वाढली आहे. आताच्या काळात लोकांसाठी कॅन्सर हा शब्द अपरिचित नाही. ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड कॅन्सर ही नावं तर सर्वांनी ऐकली आहेत. पण तुम्ही कधी बाईल डक्ट कॅन्सरचे नाव ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला बाईल डक्ट कॅन्सरविषयी माहिती देणार आहोत. एबीपी माझा हिंदीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पित्त नलिकाच्या कर्करोगाला कोलॅन्जिओकार्सिनोमा असेही म्हणतात. हा कॅन्सर पित्ताशयातील कर्करोगाच्या पेशींच्या वाढीमुळे होतो. दुर्मिळ असल्यामुळे या कॅन्सरची लक्षणे ओळखणे थोडे कठीण होते. पित्त मूत्राशय पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असते. या कर्करोगाबद्दल जास्त लोकांना माहित नाही. मात्र ज्या लोकांना हा कॅन्सर आहे त्यांच्यामध्ये हा रोग खूप वेगाने वाढण्याचा आणि पसरण्याचा धोका असतो.
तुमच्या शरीरात ‘हे’ बदल दिसतायेत? वेळीच सावध व्हा असू शकतो किडनीशी संबंधित आजारनॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, शरीरावर हे ट्यूमर कुठे आहेत, त्यांचा आकार काय आहे आणि ते किती वेगाने पसरत आहे? यावरून रुग्णाची स्थिती किती गंभीर आहे हे ओळखता येते. बाईल डक्ट कॅन्सर म्हणजेच पित्त नलिकेच्या कर्करोगाची अनेक लक्षणे आहेत, जी ओळखणे कठीण आहे. ही लक्षणे कोणत्याही व्यक्तीमध्ये सामान्य समस्यांसारखी दिसू शकतात.
पित्त नलिकाच्या कर्करोगाची लक्षणे - त्वचा पिवळी पडणे - डोळे पांढरे होणे - त्वचेला खाज सुटणे - गडद पिवळे मूत्र, फिकट गुलाबी मल - भूक न लागणे किंवा अचानक वजन कमी होणे - नेहमी आळस आणि उर्जेची कमतरता - उच्च ताप - मळमळ किंवा पोटदुखी पित्त नलिका कर्करोगाची लक्षणे सामान्य आजारांसारखी दिसत असल्यामुळे याकडे दुलुक्ष होऊ शकते. मात्र तुम्हाला अशा प्रकारचा त्रास जास्त प्रमाणात होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. नाहीतर हा आजार अधिक वेगाने वाढू शकतो आणि संपूर्ण शरीरात पसरतो. जर हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आला तर कॅन्सरपासून बचावाची शक्यता बर्याच प्रमाणात वाढते.
मांसाहाराचे शौकीन असाल तर व्हा सावध, होऊ शकतात हे गंभीर दुष्परिणाम(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)