JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? पाहा सद्गुरू काय म्हणतात

एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? पाहा सद्गुरू काय म्हणतात

काहीजण एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवतात. मात्र, याचा नेमका काय तोटा होऊ शकतो, हे देशातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू सद्गुरु यांनी सांगतानाच असं करणं किती धोकादायक असू शकतं, हे स्पष्ट केलं आहे.

जाहिरात

एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आजकाल कॅज्युअल सेक्स ही गोष्ट फारच सामान्य झाली आहे. एकापेक्षा जास्त जणांशी शारीरिक संबंध ठेवू नका, असं अनेकदा सांगितलं जातं. बऱ्याचवेळा यामुळे एचआयव्हीसारखा आजार होण्याचा धोका असल्याचंही सांगितलं जातं. पण त्यानंतरही काहीजण एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवतात. मात्र, याचा नेमका काय तोटा होऊ शकतो, हे देशातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू सद्गुरु यांनी सांगतानाच असं करणं किती धोकादायक असू शकतं, हे स्पष्ट केलं आहे. आजच्या काळात एक गोष्ट जी तरुणाईमध्ये सर्वाधिक वाढत आहे, ती म्हणजे कॅज्युअल सेक्स. पण याचे धोकेही आहेत. यामुळेच प्रत्येकजण याबाबत सावधगिरी बाळगून अंतर राखण्याचा सल्ला देतो. मात्र, त्यानंतरही शारीरिक सुखासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवण्याचा ट्रेंड वाढताना दिसतोय. याचा कोणत्याही व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो, याबद्दल सद्गुरुंनी विचार मांडलेत.

सद्गुरूंना एका कार्यक्रमामध्ये कॉलेज तरुणीने भावनाविरहित शारीरिक संबंध ठेवण्याच्या तरुणांमधील वाढत्या प्रवृत्तीबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सद्गुरूंनी मोकळेपणाने त्यांचे विचार मांडले, व वारंवार होणारी ही शारीरिक जवळीक संपूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त करते, हे सांगितलं. कॉलेज तरुणीच्या प्रश्नावर उत्तर देताना सद्गुरू म्हणाले की, ‘जेव्हा लैंगिक किंवा कोणत्याही प्रकारचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं, ज्यामध्ये विचार, भावना आणि शरीर यांचा समावेश होतो, तेव्हा शरीराशी मोठ्या प्रमाणात आठवणी जोडल्या जातात. यामुळेच नेहमी असं म्हटलं जातं की, हे नातं जितकं साधं आणि स्वच्छ ठेवलं जाईल, तितकं ते चांगलं.’ यावर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं की, त्याला स्वतःच्या शरीराचं काय करायचं आहे. जर त्यानं बर्‍याच भौतिक अनुभवायचं ठरवलं, तर नंतर त्याच्या आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याला कधीही आनंद आणि शांती मिळणार नाही. त्यामुळे इथे प्रश्न नैतिकतेचा नसून, तुम्हाला तुमच्या शरीरासाठी कोणता निर्णय घ्यायचा आहे याचा आहे.’ Health Tips : जेवणानंतर नक्की किती वेळाने औषधं घ्यावीत? शरीराची जास्त बंधनं गोंधळ वाढवतात : या वेळी शरीर पिढ्यानपिढ्या गोष्टी कशा लक्षात ठेवतं, हे सांगण्यासाठी सद्गुरूंनी उदाहरण दिलं. ते म्हणाले, ‘मन काही गोष्टींकडे लक्ष देत नाही, पण शरीराला नेहमी सर्व काही आठवतं. हेच कारण आहे की, एखाद्याने दररोज 5 मित्रांसोबत हस्तांदोलन केलं आणि एखाद्या दिवशी त्याच्या खांद्याला एखाद्या मित्रानं पाठीमागून स्पर्श केला, तरी त्याच्या मागे कोण उभे आहे, हे त्या व्यक्तीला समजतं.’ सद्गुरुंनी स्पष्ट केलं की, ‘या भौतिक स्मृतीला असे ऋणानुबंध म्हणतात, जे रक्त किंवा शारीरिक संबंधांद्वारे निर्माण होतात. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत हस्तांदोलन किंवा मिठी मारण्याऐवजी हात जोडून अभिवादन करण्याची परंपरा आहे. शरीराची ही बंधनं जितकी जास्त तितका गोंधळ वाढतो’. दरम्यान, एकापेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणं हे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं सांगितलं जातं. पण त्यामागे स्वतःच्या शरीरासंबंधी महत्त्वाचं कारण असून, त्यावरच सद्गुरूंनी प्रकाश टाकत एकप्रकारे तरुणाईला अशा शारीरिक संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या