JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health : डायबेटीस असताना गर्भधारणेचा विचार करताय? मग या गोष्टींची घ्या खास काळजी

Health : डायबेटीस असताना गर्भधारणेचा विचार करताय? मग या गोष्टींची घ्या खास काळजी

सध्याच्या काळात स्त्रियांना तरुण वयापासूनच रक्तदाब किंवा डायबेटीससारखे आजार जडू लागले आहेत. अशा स्त्रियांनी तर बाळाचा विचार करण्याआधी संपूर्ण काळजी घेतली पाहिजे.

जाहिरात

डायबेटीस असताना गर्भधारणेचा विचार करताय? मग या गोष्टींची घ्या खास काळजी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रसूती म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. त्याचं कारण गरोदरपण, प्रसूती व त्यानंतरच्या काळात स्त्रियांच्या शरीरात व मानसिक अवस्थेतही आमूलाग्र बदल घडतात; मात्र या सर्वांसाठी ती स्त्री शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसेल, तर त्याचे विपरीत परिणामही भोगावे लागू शकतात. सध्याच्या काळात स्त्रियांना तरुण वयापासूनच रक्तदाब किंवा डायबेटीससारखे आजार जडू लागले आहेत. अशा स्त्रियांनी तर बाळाचा विचार करण्याआधी संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. विशेषतः डायबेटीस असलेल्या स्त्रियांना डॉक्टरांच्या मदतीनं योग्य पावलं उचलून नंतरची जोखीम कमी करता येऊ शकते. त्यासाठी बेंगळुरूच्या कावेरी रुग्णालयातल्या सिनिअर कन्सल्टंट, गायनॅकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन डॉ. रितू चौधरी यांनी 6 उपयुक्त टिप्स सांगितल्या आहेत. 1. दिवस राहण्याआधीच घ्या समुपदेशन - डायबेटीस असताना बाळाचा विचार करत असलात, तर आधीच तुमच्या डॉक्टरांचं समुपदेशन घ्या. यामुळे तुमच्या डायबेटीस व्यवस्थापनाचं नियोजन, तुमची प्रकृती व त्या दृष्टीने रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक ते काही बदल ते सुचवू शकतील. तुमची नेहमीची औषधं गरोदरपणामध्ये योग्य ठरतील का, याबाबतही डॉक्टर मार्गदर्शन करू शकतात.

2. रक्तातल्या साखरेची निर्धारित पातळी राखा - गरोदरपणात स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी रक्तातली साखर नियंत्रित राहणं गरजेचं असतं. म्हणून दिवस राहण्याआधीच ही पातळी नियंत्रित सीमेवर स्थिर कशी राहील यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी इन्सुलीन किंवा औषधं, संतुलित आहार, नियमित व्यायाम हे गरजेचं असतं. 3. A1C पातळीवर लक्ष ठेवा - A1C रक्तचाचणीमध्ये तुमच्या रक्तातल्या गेल्या 2-3 महिन्यांतल्या साखरेची सरासरी पातळी दिलेली असते. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ही पातळी योग्य ठेवणं गरजेचं असतं. सर्वसाधारणपणे दिवस राहण्याआधी व त्यानंतर 6.5 ते 7 टक्के ही पातळी असावी. 4. आरोग्यासाठी आधार ठरेल अशी टीम - डायबेटीस आणि गरोदरपण या दोन्हींमधले तज्ज्ञ तुमच्या हाताशी असतील, याची काळजी घ्या. तसंच तुम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन, डायबेटीसची माहिती असणारे व नोंदणीकृत आहारतज्ज्ञ यांच्याशी संपर्कात राहा. यामुळे गरोदरपणात प्रत्येक समस्येबाबत सर्व बाजूंनी व योग्य वेळी मार्गदर्शन मिळू शकतं. Monsoon Tips : पावसाळयात कांदे बटाटे लवकर सडतात? जास्त काळ टिकवण्यासाठी या टिप्स वापरा 5. पौष्टिक आहारावर भर द्या - डायबेटीस आणि गरोदरपण यात संतुलित आहार सर्वांत महत्त्वाचा असतो. एखाद्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञाकडून तुमच्यासाठी आहाराचं मार्गदर्शन घ्या. यात डायबेटीसची काळजी घेण्यासाठी काय खाता येईल हे कळेल. फळं, भाज्या, धान्य, प्रथिनं, स्वास्थ्यपूर्ण फॅट्स अशा पौष्टिक घटकांवर भर देता येईल. 6. स्वतःची काळजी आणि ताण व्यवस्थापन - डायबेटीस असताना मूल होण्यासाठी प्रयत्न करणं हे शारीरिक व मानसिक ताण देणारं ठरू शकतं. म्हणून आधीपासूनच स्वतःची काळजी घेण्याची सवय लावा. मेडिटेशनसारख्या ताण हलका करणाऱ्या गोष्टी आधापासूनच सुरू करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करा. गरोदरपणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखणं अधिक गरजेचं असतं. डायबेटीस असल्यामुळे काही अडचणी अचानक येऊ शकतात. त्या टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी वेळोवेळी चर्चा करणं व तुमच्या तब्येतीची माहिती देणं महत्त्वाचं असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या