वजन वाढवण्यासाठी करा घरगुती उपाय
मुंबई, 16 जून : काहींना वजन वाढत असल्याचा त्रास होतो, तर काहींची मात्र अनेक प्रयत्न करूनही वजन वाढत नाही, अशी तक्रार असते. एखाद्याचे सडपातळ शरीर असेल आणि वजन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून झाले असतील तर, आहारात या पदार्थाचा समावेश करा, जेणेकरून तुमचं वजन वाढण्यास मदत होईल. आम्ही इथे बटाट्याबद्दल बोलत आहोत. भारतातील प्रत्येक घरात बटाटे असतात. यामध्ये पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर बटाटे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात. पण त्यासाठी त्याचं व्यवस्थित सेवन करणं आवश्यक आहे. बटाटे आपल्या दैनंदिन आहाराचा भाग आहेत. हेच बटाटे वजन वाढवण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. बटाट्यात सर्वाधिक प्रमाणात स्टार्च असतं. या शिवाय, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि झिंकदेखील त्यात आढळतं. वजन वाढवण्यासाठी बटाटे फायदेशीर आहेत, पण ते जास्त खाऊ नये आणि घाईत चावूही नये. तुम्ही तो भाजून किंवा तळून खाऊ शकता. मसालेदार किंवा तिखट बटाटे खाणंही चांगलं आहे. तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे शिजवून खाऊ शकता, यामुळे तुम्हाला जेवणात व्हरायटी मिळेल. वजन वाढवण्यासाठी तीन पदार्थांबरोबर बटाटे खा. Summer Tips : उन्हाळ्यातील अनेक त्रासांवर रामबाण उपाय आहे हे पीठ! शरीराला मिळेल थंडावा दही दही आणि बटाट्यांचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात हे खाल्ल्याने पोटातील उष्णता कमी होते आणि ताजेपणा येतो. यासाठी दोन ते तीन उकडलेले बटाटे कुचकरा. त्यात काळं मीठ, जिरे पूड, कोथिंबीर घालून मिक्स करा. नंतर त्यात दही घाला. याचे नियमित सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते. दूध दूध आणि बटाटे एकत्र खाल्ल्यानेही वजन वाढण्यास मदत होते. यासाठी एका ग्लास कोमट दुधात दोन-तीन कुचकरलेले बटाटे टाळा. तुम्ही त्यात साखरही घालू शकता. या मिश्रणाचे सेवन केल्यास वजन लवकर वाढण्यास मदत होईल. तूप अनेकांना उपवासाला बटाटे तुपात तळून खायला आवडतात. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही तुमच्या नियमित आहारात याचा समावेश करू शकता. देशी तूप आणि बटाट्याचे मिश्रण चविष्ट असतंच, पण त्याचा तुमच्या शरीराला फायदाही होतो. बटाटे तुपात हलके तळून घ्यायचे, हे मात्र कायम लक्षात ठेवा.