JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / विवाह मुहूर्त 2022: यावर्षीही लग्नाचा धुमधडाका, डिसेंबरपर्यंत तब्बल 94 शुभ मुहूर्त; वाचा संपूर्ण यादी

विवाह मुहूर्त 2022: यावर्षीही लग्नाचा धुमधडाका, डिसेंबरपर्यंत तब्बल 94 शुभ मुहूर्त; वाचा संपूर्ण यादी

15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. त्यानंतर शुभ कार्य करण्यासाठी कोणतीही अडचण असणार नाही.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 जानेवारी: नवीन वर्ष 2022 (New Year 2022) सुरू झाले आहे. जानेवारी 2022 मध्ये मकर संक्रांत (Makar Sankranti) असून या महिन्यात खरमासही (Kharmas) संपेल. 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे. त्यानंतर शुभ कार्य करण्यासाठी कोणतीही अडचण असणार नाही. लग्न (marriage), मुंज, साखरपुडा, गृहप्रवेश यासाठी शुभ मुहूर्त सुरू होतील. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्या दिवसापासूनच खरमास सुरू होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य होत नाही. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमास संपतो. खरमासच्या काळात सूर्याची हालचाल मंदावते आणि गुरूचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे खरमासात शुभ कार्य होत नाहीत. शुभ कार्यांसाठी गुरु प्रभावी किंवा उच्च स्थानात असणं आवश्यक आहे. जानेवारी महिन्यात खरमास संपत आहे. त्यामुळे शुभ कार्य करण्याचा मार्ग मोकळा झाला असून येथून पुढे डिसेंबर महिन्यापर्यंत लग्नाच्या 94 तिथी आहेत. चला तर जाणून घेऊया नवीन वर्ष 2022 मध्ये कोणकोणत्या महिन्यात लग्नतिथी (Vivah Muhurat 2022) आहेत. वर्ष 2022 मधील शुभ मुहूर्त  जानेवारी महिन्यात 22, 23, 24 आणि 25 जानेवारी हे शुभ मुहूर्त  आहेत. फेब्रुवारी महिन्यात 5, 6, 7, 9, 10, 18, 19 आणि 20 फेब्रुवारीला लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. एप्रिल महिन्यात 15, 16, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 27 एप्रिलला शुभ मुहूर्त आहे. मे महिन्यात 2, 3, 4, 9, 10, 11, 12, 16, 17, 18, 20, 21, 26, 27 आणि 31 मे या लग्नाचा चांगला मुहूर्त आहेत. जून महिन्यात 1, 6, 8, 10, 11, 13, 20, 21, 23 आणि 24 जूनला लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. जुलै महिन्यात 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 14, 18, 19, 20, 21, 23, 24, 25, 30 आणि 31 जुलैला शुभ मुहूर्त  आहे. ऑगस्ट महिन्यात 1, 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 14, 15, 19, 20, 21, 28, 29, 30 आणि 31 ऑगस्टला लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. सप्टेंबर महिन्यात 1, 4, 5, 6, 7, 8, 26 आणि 27 सप्टेंबरला शुभ मुहूर्त  आहे. डिसेंबर महिन्यात 2, 4, 7, 8, 9 आणि 14 डिसेंबर या दिवशी लग्नाचे चांगले मुहूर्त आहेत. नवीन वर्ष 2022 मध्ये मार्च, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी कोणताही मुहूर्त नाही. कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यात निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातदेखील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली असून लग्न सोहळ्यासाठी नियमावली ठरवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी लग्नाच्या जवळपास 94 तिथी असल्या तरी वेळोवेळी कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकारचे निर्बंध ठरणार आहेत. त्या नियमावलीचे पालन करुन लग्न सोहळा पार पाडावा लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या