मुंबई, 01 फेब्रुवारी : Valentine Day 2021 फेब्रुवारी महिना आला की, व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. अनेक जण व्हॅलेंटाईन डेसाठी मोठी तयारीही करतात. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जातात, गुलाब, चॉकलेट्स, ज्वेलरी खरेदी करून एक खास डेट प्लॅन करतात. परंतु सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून व्हॅलेंटाईन डे एका वेगळ्या अंदाजात साजरा केला जाऊ शकतो. बेकिंग-होम अॅक्टिविटीज - स्वत: च्या हाताने केक आणि कुकीज बनवून पार्टनरला सरप्राईज देऊ शकता. बेकिंग रोजचं जेवण बनवण्यापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे ही ग्रुप, होम अॅक्टिविटीही होऊ शकते. घरी बनवलेल्या खास पदार्थांनी तुमची व्हॅलेंटाईन डेट प्लॅन करा. होम स्पा - आजकल अनेक सर्व्हिसेज होम स्पा ऑफर करतात किंवा तुम्ही घरीच होम स्पा प्लॅन करू शकतात. काही शीट मास्क, स्नॅक्स, अरोमा थेरेपी, कँडल-म्युझिक थेरेपी, स्पा क्रीमचा यासाठी वापर करू शकता. घरातच अनेक फुलांनी रुम-घर सजवू शकता.
होम सिनेमा नाईट - एखाद्या आवडत्या हॉटेलमधून जेवण मागवून, घर सवजून, घरातच मूव्ही नाईटचा आनंदही घेऊ शकता. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, हॉटस्टार ऑनलाईन मूव्ही स्ट्रीमिंग अॅप्सवर चांगले चित्रपट पाहू शकता. या कोरोना काळात काय गिफ्ट द्याल - - तुमच्या पार्टनरला फुलं, प्लांट्स गिफ्ट देऊ शकता. गुलाबापासून ते मोगऱ्यापर्यंतची कोणतीही सुगंधी रोपटी किंवा एअर प्युरिफाय करणारी रोपटीही देऊ शकता.
- पार्टनरला कस्टमाईज्ड गिफ्ट्स देऊ शकता. फोटो फ्रेमपासून ते किचन आयटमपर्यंत कोणतंही गिफ्ट देऊ शकता. फेअरी टेल लाईट्सचा वापर करून घर सजवू शकता. - महिला आणि पुरूष दोघांसाठीही रिंग, गळ्यातील चेन गिफ्टचा चांगला पर्याय आहे.