खवखवणाऱ्या घशाकडे दुर्लक्ष नको; असू शकतं मानसिक आजाराचं लक्षण

खवखवणाऱ्या घशाकडे दुर्लक्ष नको; असू शकतं मानसिक आजाराचं लक्षण

जेव्हा आपण तणावात किंवा चिंताग्रस्त असता तेव्हा आपलं शरीर आपल्या रक्तप्रवाहात एड्रेनालाइन आणि कोर्टिसोल सोडतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी : काही थंड प्यायल्याने किंवा सर्दी-खोकला असेल तर घसा खवखवतो (Sore Throat). पण घसा खवखवणं यापुरतंच मर्यादित नाही तर हे मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. खवखवणारा घसा तुम्हाला एन्झायटी (Anxiety) असल्याचे संकेत देतं.  एन्झायटी हा मानसिक आजार आहे. त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. घसा खवखवणे (Sore Throat) हे एन्झायटीच्या अनेक संभाव्य शारीरिक लक्षणांपैकी एक आहे.

हेल्थलाईनच्या वृत्तानुसार, जेव्हा तुम्ही तणावात किंवा चिंतेत असता, तेव्हा तुमचं शरीर तुमच्या रक्तात एड्रेनालाइन आणि कोर्टीसोल प्रवाहित करते. या हार्मोन्सच्या अंसतुलनामुळे हार्ट रेट (Heart Rate) आणि रक्तदाब वाढणं (Blood Pressure) तसंच अन्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये जोरात किंवा कमी श्वास घेण्यात अडचणी, तोंडाद्वारे श्वास घेणं, खोकला, स्नायूंमधील तणाव यांचा समावेश आहे.  शिवाय घशात खवखवणे, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, घशात जळजळ, घशात कोरड पडणं अशा समस्याही निर्माण होतात.

याशिवाय घशासंबंधी खालील समस्याही उद्भवतात.

स्नायूंमधील ताण-डिस्फोनिया

स्नायूंमधील ताण म्हणजेच डिस्फोनिया हा असा आजार आहे की ज्यात आवाजाच्या अनुषंगाने पूरक ठरणारे स्नायू आणि श्वसनाचा पॅटर्न यांचा समावेश असतो. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमचा आवाज नियंत्रित करणाऱ्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे तुमचा आवाज कर्कश किंवा मोठा होतो.

डिस्फागिया

डिस्फागिया हा गिळण्याच्या संबंधी विकार आहे. आतड्यांसंबंधी मस्या हे डिस्फागिया होण्याचं प्रमुख कारण आहे.

 हे वाचा - अरे बापरे! फुफ्फुसातून गायब झाला तरी मेंदूत लपून बसतोय कोरोनाव्हायरस

ग्लोबस सेन्सेशन (Globas Sensation)

जर तुम्हाला तुम्हाला घशात गाठ आहे असे वाटत असेल आणि प्रत्यक्षात काहीच नसेल तर याला ग्लोबस सेन्सेशन म्हणतात. ही बाब फारशी त्रासदायक नसते. परंण चिंता आणि तणावामुळे त्यात वाढ होत जाते.

एन्झायटी कशी कमी कराल?

आरामात श्वास घ्यावा

योग्य अंतरापर्यंत चालण्याचा व्यायम करावा

चांगले संगीत ऐकावे

आपले आवडते काम करावे

मित्रांसोबत दिलखुलास संवाद साधावा

 हे वाचा - वेगानं कंट्रोल करता येणार Diabetes; AIIMS च्या डॉक्टरांनी शोधला उपाय

दररोज व्यायाम करावा

आरोग्यदायी आणि संतुलित आहार घ्यावा

मद्यपान आणि तंबाखू सेवनापासून दूर राहवे

पुरेशी झोप घ्यावी

मेडिटेशन करावे

Published by: Aditya Thube
First published: January 30, 2021, 1:23 PM IST

ताज्या बातम्या