JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Valentine Day 2021: ऑनलाईन खरेदी करताना बाळगा सावधगिरी अन्यथा...

Valentine Day 2021: ऑनलाईन खरेदी करताना बाळगा सावधगिरी अन्यथा...

Valentine Day 2021: जर या व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही कोणा जवळच्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगचा विचार करत असाल तर तुम्हाला सायबर चोरांपासून अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

जाहिरात

Valentine day

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : हा सप्ताह प्रेमाचा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) आहे. आज 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांना काही ना काही गिफ्ट जरुर देतात. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेचा फायदा घेण्यासाठी सायबर चोर (Cyber thief) देखील सज्ज झाले आहेत. ते लोकांना फ्री गिफ्टचे मेसेज पाठवत फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण या मेसेजला जर तुम्ही उत्तर दिले तर तुमचे बॅंक अकाऊंट रिकामे होऊ शकते. सायबर चोर जाळ्यात कसे ओढतात**?** जर तुम्ही कोणाला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर सावध राहा, कारण या कालावधीत सायबर चोर मोबाईल किंवा ई-मेलवर ऑफर किंवा कूपन पाठवत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही अमिषाला बळी पडलात तर तुमच्या खिशाला ही गोष्ट महागात पडू शकते. सायबर सेलच्या (Cyber cell) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजीटली चोऱ्या करणारे मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या नावांचा वापर करुन नव्या ऑनलाईन ऑफर किंवा गिफ्टचे अमिष दाखवून तुमचे बॅंक अकाउंट रिकामे करु शकतात. व्हॅलेंटाईनच्या नावावर होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय कराल**?** व्हॅलेंटाईन डेच्या नावावर होणारी फसवणूक टाळण्यासाठी सायबर दोस्त (Cyber Dost) ने एक व्टीट केले आहे. सायबर दोस्त हे गृह मंत्रालयामार्फत चालवले जाणारे ट्विटर हॅंडल आहे. या माध्यमातून सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण केली जाते. सायबर दोस्तने आपल्या व्टिटर हॅंडलवर म्हटले आहे की नकली व्यापारी किंवा वेबसाईट व्हॅलेंटाईन डे या थीमवर गिफ्टस व्हाउचर, चाॅकलेटस, गुलाबाचे फूल, ज्वेलरी सारख्या गिफ्टवर मोठ सूट मिळवण्यासाठी लिंक पाठवतात. या लिंकवर तुम्ही क्लिक केले की तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे जाते. त्यामुळे ऑनलाईन काहीही खरेदी करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. हे वाचा -    Love Story : रवींद्रनाथ टागोरांच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी… फसवणूक झाल्यास काय कराल**?** अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तुम्ही जवळील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करु शकता किंवा www.cybercrime.gov.in  या सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलवरुन (Cyber Crime Repoerting Portal) आॅनलाईन तक्रार दाखल करु शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या