JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कॅन्सर, हृदयविकारांनाही रोखता येणार, मिळणार लस; कधीपासून उपलब्ध होणार पाहा

कॅन्सर, हृदयविकारांनाही रोखता येणार, मिळणार लस; कधीपासून उपलब्ध होणार पाहा

पहिल्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झालं तर संबंधित रुग्णाला उपचारातून योग्य दिलासा मिळू शकतो. हृदयविकार असलेल्या रुग्णालादेखील आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 एप्रिल : कॅन्सर अर्थात कर्करोग आणि हृदयविकार हे गंभीर स्वरूपाचे आणि जीवघेणे आजार मानले जातात. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झालं तर संबंधित रुग्णाला उपचारातून योग्य दिलासा मिळू शकतो. हृदयविकार असलेल्या रुग्णालादेखील आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. जगभरात दर वर्षी या दोन्ही विकारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कॅन्सर आणि हृदयविकारावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात; पण हे विकार कसे रोखता येतील याविषयी ठोस माहितीचा अभाव आहे. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी किंवा संसर्ग झाला तरी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी लशीची निर्मिती केली गेली. या लशीचा कोट्यवधी नागरिकांना फायदा झाला. आता भविष्यात कॅन्सर आणि हृदयविकार रोखण्यासाठी अशाच प्रकारची लस तयार होऊ शकते. कॅन्सर आणि हृदयरुग्णांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या आजारांवर लवकरच लस बनवता येईल, असा दावा अमेरिकी तज्ज्ञांनी केला आहे. या दशकाच्या अखेरीस जगभरातले कॅन्सर आणि हृदयविकार असलेले रुग्ण लशीद्वारे बरे होऊ शकतील. वास्तविक, कोरोना महामारीदरम्यान लस संशोधन झाल्यामुळे संशोधकांना कॅन्सर आणि हृदयविकारावर लस शोधणं सोपं झालं आहे. नागरिक लवकरच कॅन्सर, हृदयविकार व रक्तवाहिन्यांसंबंधी, तसंच ऑटोइम्युन विकार आणि अन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी लस घेऊ शकतील. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, कोविड लशीनंतर आता अमेरिकी तज्ज्ञ अशी लस तयार करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्यूमर, कॅन्सर नष्ट होऊ शकेल. या लशी 2030पर्यंत तयार होतील. लस तयार झाल्यास लाखो जणांचे प्राण वाचू शकतात, असा विश्वास या अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे. मॉडर्ना या फार्मास्युटिकल कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी सांगितलं, की, ‘आमची फर्म पाच वर्षांत सर्व प्रकारच्या रोगांवर अशा प्रकारचे उपचार उपलब्ध करून देऊ शकेल.’ बर्टन म्हणाले, की, ‘आमच्याकडची लस अत्यंत प्रभावी असेल आणि लाखोंचा जीव वाचवेल. आम्ही जगभरातल्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्यूमर, कॅन्सरसाठी लस उपलब्ध करून देऊ, असं आम्हाला वाटतं. एका इंजेक्शनमधून अनेक प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळवता येऊ शकेल. अशक्त व्यक्तींना कोविड, फ्लू आणि रेस्पिरेटरी सिन्सिटिअरल व्हायरसपासूनही (आरएसव्ही) संरक्षित केलं जाऊ शकतं. आजपासून दहा वर्षांनी आपण अशा जगात पोहोचू, जिथे आपण एखाद्या रोगाचं कारण ओळखू शकू आणि mRNA वर आधारित तंत्रज्ञान वापरून त्यावर उपचार करू शकू, असं मला वाटतं.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या